कुरणपिंप्रीचे सरपंच रेहाज पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश
गेवराई दि.१४ (वार्ताहार) गेवराई विधानसभा मतदारसंघात विकासाचा विचार पेरण्यासाठी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करणाचा निर्णय घेऊन कुरणपिंप्री येथील युवा उद्योजक आर. के. पटेल, कुरणपिंप्रीचे सरपंच रेहाज पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
कुरणपिंप्री येथील युवा उद्योजक आर. के. पटेल, कुरणपिंप्रीचे सरपंच रेहाज पठाण यांच्यासह कलीम पठाण, ग्रा.पं सदस्य सुनील कूंधारे, शेख मुसा मुनीर, नशिर उस्मान पठाण, अल्ताफ पठाण, बादशाह नाजू शेख, के.के.खान यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप-सेनेला सोडचिट्ठी देत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अमरसिंह पंडित यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांना राष्ट्रवादीचा विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले. या वेळी नंदकिशोर गोरडे, पैठणचे पं. स. सदस्य विशाल थोटे, सरवर पठाण, शिवाजी गंगाधर, आपासाहेब गंगाधर, अशोक बोरकर, अशोक जाधव, परिक्षीत जाधव, अप्पासाहेब गायकवाड, अण्णासाहेब गवारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. पटेल यांनी तर आभार राहुल जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन शिवाजी वैद्य यांनी केले.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...