January 22, 2025

काळ्या बाजारात जाणाऱ्या राषनचा ट्रक ताब्यात;उपअधीक्षक पथकाची कार्यवाई 

                                     गेवराई दि १३( वार्ताहार )

माजगाव कडून बीड कडे जात असतांना एका ट्रकवर पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकाने हात दाखवला व तो थांबवला नाही त्यावर संशय आल्याने सदरचा ट्रक ताब्यात घेतला असता त्यामध्ये राषनचा तांदूळ असल्याचे निर्दशनास आले .व सदरच्या कार्यवाई  लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराईचे पोलिस उपअधीक्षक सोप्नील राठोड यांच्या पथकाला गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नांदेडवरून एम एच २६ ए डी ७७१७ मध्ये अनाधिकृत राषनचा तांदूळ घेऊन जात आहे त्यानुसार उपअधीक्षक पथकातील कर्मचारी यांनी राष्ट्रीय महामार्ग गढीवर सदर गाडीला हात देऊन थांवण्याचा प्रयत्न केला परंतू सदरचे वाहन हे पलायन करण्याच्या तयारीत होते मात्र वेळीच सावधगरी बाळगून तो ट्रक पथकातील कर्मचारी यांनी पकडला व त्यामध्ये ५० कीलोचे ५०४ पोते आढळून आले तसेच हा ट्रक जप्त करण्यात आला असुन या कार्यवाईत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व गेवराई  पोलिसांच्या ताब्यात दिला आहे या प्रकरणी योग्य ती कार्यवाई करण्याचे आदेश गेवराई पोलिसांना देण्यात आले असल्याची माहीती उपअधीक्षक सोप्नील राठोड यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *