January 22, 2025

शेततळ्याचे पैसे दूसऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यानं;पंसचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

                                  गेवराई दि १२ ( वार्ताहार )
येथील पंचायत समितीच्या कार्यालयात बुधवारी दोन जणांनी रोजगार हमी योजनेच्या ऑपरेटर व एपीओला शिवीगाळ, धक्काबुक्की करून संगणक फोडल्याचा प्रकार पाच वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता व गुरुवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोषी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलीस निरीक्षक यांना पत्र पाठवले असुन मात्र यात वास्तूस्थिती वेगळीच आहे गजानन काळे यांच्या नावावर असनाऱ्या शेततळ्याचे पैसे दुसऱ्याच खात्यावर वर्ग केल्यानं पचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून स्वत:च वरिल कार्यलयातील लोकांचीच संगणक फोडले असल्याची माहिती आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गजानन काळे , व कैलास माने यांनी गेवराई पंचायत समितीच्या कार्यालयात बुधवारी दोन जणांसोबत हुज्जत घातली कारण की गजानन काळे यांच्या नावे शेततळे आहे त्याचे १८ ००० हजार रुपये वरिल दोन ऑपरेटरने संगनमत करून अपहार करण्याच्या उद्देशाने दूसऱ्याच व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर केले असल्याची बाब गजानन काळे यांच्या लक्षात आली त्यांनी यांचा जाब विचारण्यासाठी संबंधीत ऑपरेटर याला विचारपुस करायला सुरूवात केली त्यानंतर अपेक्षीत उत्तर मिळाले नाही उलट तू आमचा मालक आहे का ? अशी उर्मट भाषा गजानन काळे यांना वापरण्यात आली असल्याने तसेच कार्यलयातील संगणक देखील ऑपरेटर यांनीच फोडले असल्याचे देखील  गजानन काळे यांचे म्हणने आहे तसेच कार्यालय येऊन रोजगार हमी संदर्भात ऑपरेटर अमीरोद्दीन अलीमोद्दीन शेख आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नितीन तोगे यांना विचारणा केली असता त्यांचे म्हणने आहे की  त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून संगणक फोडले आहे असे त्या ऑपरेटर दोघांचे म्हणने  आहे या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोषी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी गेवराई पोलीस निरीक्षक यांना पत्र पाठवले आहे. परंतु कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की, शिवीगाळ करण्याची वेळ कश्यामुळे आली यांची देखील चौकशी व्हावी असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होऊ लागला आहे. अनेक कामे देणे-घेणे केल्याशिवाय होत नाही, अनेक अधिकाऱ्यांना काही मिळाल्याशिवाय काम करण्याची सवय नाही, यामुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा पंचायत समिती आवारात होत आहे.तसेच या प्रकारामुळे गेवराई पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे असे म्हणने देखील वावगे ठरणार नाही 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *