गेवराई दि १२ ( वार्ताहार ) अनाधीकृत वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली तसेच त्यांनी सदरच्या तिन हायवावर कार्यवाई केली आहे व जवळपास दोन कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील अनेक ठिकाणी अनाधीकृत वाळू उपसा सुरू आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नागझरी याठिकाणी डिसेंन्ट हॉटेल जवळ या पथकाने तिन वाळूने भरून चाललेल्या हायवा ताब्यात घेतल्या व त्यांना रॉयल्टी बाबद विचारना केली असता त्यांच्याजवळ रॉयल्टीची पावती नव्हती म्हणून पुढील कार्यवाईसाठी या हायवा गाड्या गेवराई पोलिस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत तसेच अधिक तपास पोलिस करत आहेत.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...