जागतिक महिला दिनानिमित्त मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीराचे गेवराईत आयोजन

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचा उपक्रम

           गेवराई दि.७ ( वार्ताहार ) 

शहर  राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियाना अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त खास गेवराई शहरातील महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आज मंगळवार दि.०८ मार्च रोजी शारदा विद्या मंदिर गेवराई या ठिकाणी करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन सौ. विजेताताई विजयसिंह पंडित यांच्या हस्ते होणार आहे. तरी या शिबीराचा लाभ गेवराई शहरातील महिलांनी घ्यावा, असे आवाहन शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये स्त्रीरोग चिकित्सा, त्वचारोग चिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, सामान्य तपासणी आदींवर उपचार केले जाणार असून तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोविड लसीकरण, विद्यार्थीनी आणि माता यांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. शिबीराची वेळ सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत असून या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ गेवराई शहरातील गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहन गेवराई शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

माजी आमदार अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, प्रदेश राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या होमियोपॅथी विभागाचे समन्वयक डॉ. सर्वोत्तम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. सुहास घाडगे हे शिबिराच्या यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत. यावेळी डॉ.महादेव चिंचोलें (वैदकीय अधिक्षक), डॉ. संजय कदम (तालुका आरोग्य अधिकारी ), डॉ. श्रीगोपाल रांदड (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. अजयसिंह पंडित (स्त्रीरोग तज्ञ) डॉ. पदमांजली पंडित (त्वचारोग तज्ञ), डॉ.मुकेश कुचेरिया (अस्थीरोग) डॉ. अभिजीत पाटील, डॉ निलेश तायडे (प्लास्टिक सर्जरी), डॉ. लेंडगुळे (स्त्री रोग तज्ञ) यांच्यासह तज्ञ डॉकटर उपस्थित राहणार आहेत. महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महीला तालुकाध्यक्ष शाहीन भाभी पठाण व शहराध्यक्ष मुक्ता आर्दड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *