April 19, 2025

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या व एकाला विजेचा धक्का;तालुक्यातील तिन घटनामध्ये तिघांचा मृत्यू

                  गेवराई दि ७ ( वार्ताहार )
तालुक्यातील हिंगनगांव , पाडुळ्यांची वाडी , तसेच गेवराई शहरातील आत्महत्या झाल्याने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिघांजनाचा मृत्यू झाली असल्याची घटना आज सकाळी उघडकिस आल्या असल्याने खळबळ उडाली आहे एकाच वेळी या तिघांचेही मृत्यूदेह उत्तरीय तपासणी साठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णलयात आनल्याने परिसरात मोठी गर्दी झाली असल्याचे दिसून आले

या बाबद सविस्तर माहिती अशी की ,गेवराई शहरातील विठ्ठल नगर येथील सुनिल दामोधर गायवाड ( वय ४९ वर्ष ) योगेश राजेंद्र जाधव ( वय १९ वर्ष ) राहनार हिंगनगांव तालुका गेवराई जि बीड व पाडूरंग किसनराव जाधव( वय ४५ वर्ष ) राहनार पाडोळ्याची वाडी तालुका गेवराई जि बीड असे तिन मयतांची नावे असुन गेवराई शहरातील विठ्ठल नगर येथील इसमांने आपल्या राहत्या घरात पोटाच्या आजाराला त्रस्त असल्या कारणाने आत्महत्या केली आहे तसेच हिंगनगांव येथील तरूण रात्री ८ वाजल्यापासुन बेपत्ता होता त्यांचा मृत्यूदेह गांवठाण परिसरात एका बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला तसेच तालुक्यातील तिसरी घटना ही विजवितरणच्या गलथान कारभारमुळे झाली आहे पाडूळ्याची वाडी याठिकाणी घराच्या दारात विजेचा पोल यांच्यात करंट उतरला व त्याचांच धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे .तालुक्यात या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनात तिघांचा मृत्यू झाला या ठिकाणी पोलिसांनी भेट दिली असुन तिनही मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णलयात आनले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *