April 19, 2025

पोलिस अधीक्षक पथकाची राक्षसभूवनमध्ये कार्यवाई;एक कोटीचा मुद्देमाल जप्त

                गेवराई दि ३ ( वार्ताहार )
तालुक्यातील राक्षसभूवन शनिचे याठिकाणी अवैध वाळूचे उत्खनन करणाऱ्या जेसीबी व दोन हायवावर पोलिस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे यामध्ये जवळपास एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराम राक्षसभूवन शनिचे याठिकाणी गोदापात्रात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आर राजा यांच्या विषेश पथकाला मिळाली यावरून या पथकाने गोदापात्रात छापा मारला असता वरिल ठिकाणी वाळू उपसा करणाऱ्या जेसीबी व दोन हायवा घटनस्तळावरून ताब्यात घेण्यात आला असुन या कार्यवाईत तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील वाहने जप्त करून पुढील कार्यवाई करण्यासाठी चकलांबा पोलिस ठाण्यात पुढील कार्यवाईसाठी लावण्यात आल्या असल्याची माहिती आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *