April 19, 2025

क्षीरसागर पिता पुत्राला न्यायालयाचा दिलासा 

                      बीड दि २ ( वार्ताहार ) 

येथील रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार  प्रकरणात दाखल गुन्हयात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र  डॉ. योगेश क्षीरसागर यांना बीडच्या सत्र न्यायालयाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. क्षीरसागर पितापुत्रांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुनावणी सुरु असून पुढील तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जामिन मंजूर करण्यात आला आहे. पाचवे जिल्हा सत्र न्यायाधिश एस.टी.डोके यांच्या न्यायालयाने हा अंतरिम जामिन दिला आहे.पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे.


बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात मागील आठवड्यात जमिन हस्तांतरणाच्या वादातून गोळीबार झाला होता. यात दोघे जखमी आहेत. यातील जखमी सतीश क्षीरसागरच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्हयात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण आणि त्यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांना आरोपी करण्यात आले आहे. सोमवारी या पितापुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आणि या अर्जाची सुनावणी होईपर्यंत अंतरिम जामिनाची विनंती केली होती. त्याची सुनावणी बुधवारी सकाळी न्या.एस.टी.डोके यांच्यासमोर झाली. यावेळी न्यायालयाने भारतभुषण आणि योगेश क्षीरसागर यांना अंतरिम जामिन देत अटकेपासून संरक्षण दिले आहे.  यात पुढील क्षीरसागर पितापुत्रांच्या वतीने विधिज्ञ मिलींद वाघिरकर, विधिज्ञ अविनाश गंडले यांनी युक्तिवाद केला, तर मुळ फिर्यादीच्या वतीने विधिज्ञ बी डी कोल्हे यांनी अंतरिम जामिनाला विरोध नोंदविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *