कीर्तन श्रावनातून जीवनात ज्ञान आणि आनंद मिळतो – ह.भ.प.प्रा.नाना म.कदम

              गेवराई दि २७ ( वार्ताहार ) 

कीर्तन श्रावणातुन कर्तव्य, भक्ती, नीती, परंपरा, अध्यात्माची अन ईश्वराची जागृती केली जाते. त्यामुळे जीवनात ज्ञान आणि आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने कीर्तनाचे श्रावण केले पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रा.नाना महाराज कदम यांनी केले.
तालुक्यातील बेलगुडवाडी येथे श्री गजानन, श्री विठ्ठल रुक्मिणी, पवनसुत हनुमान मूर्ती व महादेव पिंड स्थापनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हभप मधुकर म.डोईफोडे यांच्या शुभहस्ते सुरू असलेल्या अखंड हरिनाम साप्ताहातील तीसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेप्रसंगी ते बोलत होते.
योगीया दुर्लभ तो म्या देखीला साजणी ।
पाहता पाहता मना न पुरे धनी ।।
देखीला देखीला माय देवाचा देव ।
इथला संदेह निमाले तुझेपण ।।
अनंत रूपे अनंत वेशे देखीले म्या त्याशी ।
बाप राखुमा देवीवरी खून बांधीली कैसी ।।

या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भुपाळी अभंगावर ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, किर्तनाने अज्ञानाला ज्ञानी बनवण्याचे काम किर्तनाने केलं असून संप्रदायाने किर्तनाच्या माध्यमातून जगात सर्वात आधी जाती निर्मूलनाचे कार्य केले आणि या संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा असल्याने इथे कधीच जातीवादाला थारा दिला नाही. जाती व्यवस्थेला बाजूला सारून सर्व धर्म समभाव जपण्याचे महान कार्य हे याच संप्रदायाने केले आहे. म्हणून जीवनात जर आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येकाने कीर्तनाचे श्रावण करा असे आवाहन केले.

दरम्यान त्यांनी यावेळी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, आई-वडील, बेटी बचाव यासह आदी विषयावर अभ्यासपूर्ण चौफेर विचार मांडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना संगीत विशारद रामनाथ म.सालपे, इंद्रजित म.येवले, नाना म.काळे, जालिंदर नाना कवडे, हभप कैलास म.आनंदे, भारती महाराज यांच्यासह आदींनी गायनाची साथ दिली. तर अजय महाराज व नामदेव महाराज बेदरे व राऊत महाराज यांनी मृदंगाची उत्कृष्ट साथ दिली. यावेळी बेलगुडवाडी ग्रामस्थांसह परिसरतील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *