शेतकऱ्यांच्या पोरांनी आईबापाच्या कष्टाचं चीज करावं

शेतकरी पुत्रांनो जागे व्हा शिवरायांचे विचार आत्मसात करुन परिवर्तन घडवा

भोजगाव येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यात युवा व्याख्याते शिवश्री गणेश फरताडे यांचे प्रतिपादन

                  गेवराई,दि.२७ ( वार्ताहार )
शिवरायांचं चरीत्र हे फक्त ढाल, तलवारी अन् घोड्यांच्या टापा नाहीत तर सर्वसामान्यांना जिवन जगण्यासाठी सगळ्यात मोठा शिवमंत्र आहे.तसेच गेली अनेक वर्षांपासून शेतकरी समृद्ध होत नाही. याची कारण शेतकऱ्यांच्या मुलांनी शोधून काढली पाहिजेत शेतकरी गरीबीतून बाहेर कसा येईल याचा विचार केला पाहिजे. शिवरायांनी त्याकाळात वापरलेले नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान याचा अवलंब करुन शेतकरी पुत्रांनो शेतकरी बापासाठी जागे व्हा शिवरायांचा विचार आत्मसात करुन परिवर्तन घडवा तसेच आपल्या आईबापांच्या कष्टाचं शेतकऱ्यांच्या पोरांनी चीज करावं असे प्रतिपादन युवा व्याख्याते शिवश्री गणेश फरताडे यांनी व्यक्त केले.

गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे शुक्रवारी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.रघुनाथ महाराज निंबाळकर, प्रमुख वक्ते म्हणून युवा व्याख्याते शिवश्री गणेश फरताडे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे,सरपंच विष्णू आडे, गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, सचिव सुनील मुंडे, गेवराई पोलीस अंमलदार रणजित पवार, संतोष गाडे, पत्रकार विनोद पौळ, तुकाराम धस, उपसरपंच विक्रम संत, चेअरमन दत्ता संत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना वंदना देऊन कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जगदंबा प्रतिष्ठान व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सत्कार करुन उपस्थितांचे स्वागत केले.पुढे बोलताना शिवश्री गणेश फरताडे म्हणाले की शिवबा राजांचे चरीत्र हे आम्हाला नीतीने जगायला शिकवतं. शिवबा स्वत: लिहतात मी शत्रुला धोका दिला असेल पण मित्राला धोका दिल्याचं दाखवा, ही निती कायम आम्ही संभाळली पाहीजे, तीच खरी शिवभक्ती आहे.तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड द्यावे आता येणारा काळ हा फक्त शेतकऱ्यांचा असेल असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला‌. दरम्यान शिवजयंती निमित्त गावात भगवे ध्वज लावून भव्य जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील चिमुकल्यांनी शिवरायांच्या जीवन चरित्रावर भाषणं करुन उपस्थितांची मने जिंकली तर यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक चंद्रकांत संत यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष तसेच पंचक्रोषीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंबा प्रतिष्ठान भोजगाव व येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *