तहसिलदारा वर झालेल्या कार्यवाईच्या विरोधात लेखणी बंद
गेवराई महसुल कर्मचारी यांच्या वतिने निषेध
गेवराई दि २१ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्याचे न्यायदंडाधिकारी तथा तहसिलदार सचिन खाडे यांच्या विरोधात वाळू माफिया यांच्या पत्नीकडून वेगवेगळे तिन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यांचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यातील महसुल मधिल वेगवेगळ्या संघटनानी लेखणी बंदचा ईशारा दिला आहे आज गेवराई महसुल कर्मचारी यांच्या वतिने लेखणी बंद करून आंदोलन करण्यात आले .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , ( दि १७ रोजी ) तहसिलदार सचिन खाडे व त्यांच्या सहकारी यांनी काही वाळू माफिया यांच्याविरोधात कार्यवाई केली ह्या कार्यवाईचा वचपा म्हणून वाळू माफियांनी तहसिलदार सचिन खाडे यांच्या घरासमोर जाऊन गलिच्छ भाषेत शिगीगाळ करून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत काही वाळू माफिया विरोधात शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याचाच वचपा काढण्यासाठी चक्क वाळू माफिया यांच्या पत्नीने गेवराई पोलिसांत तहसिलदार सचिन खाडे व त्याच्यासोबत सहा ते जणांनी गैरकायद्याची मंडळी जमाकरून धमकी दिल्या प्रकरणी वेगवेगळ्या तिन तक्रारी तहसिलदार सचिन खाडे यांच्या विरोधात दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान वाळू माफियांना कोनाच्या अभय आहे एखाद्या न्यायदंडाधिकारी विरोधात तक्रार दाखल करतांना पोलिसांनी त्यांची शहानिशा करायला हवी होती मात्र तहसिलदारांवरच गुन्हा दाखल झाल्यानं महसुलच्या संघटनानी एक दिवसांचे लेखणी बंद आंदोलनाला हाक दिली याचाच परिणाम आज गेवराई येथिल महसुल कर्मचारी यांनी आज तहसिल कार्यलयाच्या पायरीवर बसुन लेखणी बंद करून निषेध नोंदविला यावेळी महसुल मधिल कर्मचारी उपस्थित होते .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...