गेवराईत दिमाखदार सोहळ्यात शिवजन्मोत्सव साजरा

विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतील छत्रपतींचे रेखाचित्र शिवप्रेमींना भावले

        गेवराई दि १९ ( वार्ताहार )

राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने गेवराई शहरात शिवजन्मोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. पंधरा हजार चौरस फुटामध्ये साकारलेल्या शिवप्रतिमेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या सोहळ्यात माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते शिवप्रतिमा पुजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शिवप्रेमींना विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र भावले, चित्रकार उद्देश पघळ आणि सुनिल बेले यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला. उत्साहाच्या वातावरणात शिवजन्मोत्सवाचे आयोजन गेवराईत करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातुन दरवर्षी नेत्रदिपक व शिस्तबद्ध शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते. विविध महानाट्य आणि एैतिहासिक देखाव्यांच्या शोभायात्रा हे आजवर शिवजन्मोत्सवाचे आकर्षण ठरले होते. यावर्षी विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतुन पंधरा हजार चौरस फुट जागेमध्ये बेसॉल्ट दगड आणि रंगांचा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराजांचे नेत्रदिपक रेखाचित्र छत्रपती शिवाजी महाराज नगरीमध्ये साकारण्यात आले. रेखाचित्राचे आनावरण माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवप्रतिमेचे पुजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मॉसाहेब यांचा वेश परिधान करुन अनेक लहान बालकांनी अतिशय उत्साहात या सोहळ्यात सहभाग नोंदविला.

सोहळा समितीच्या वतीने जयभवानी मंदिर, शिवाजीनगर येथुन रात्री शिवज्योतीचे आयोजन करण्यात आले. गेवराई शहरातील मिरवणुक मार्गावरील विविध चौकात शिवप्रेमी नागरीकांनी रात्री बाराच्या सुमारास शिवज्योतीचे उत्साहात स्वागत केले. शालेय विद्यार्थी, महिला यांसह शिवप्रेमी नागरीकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावली. ड्रोनच्या माध्यमातुन मोठ्या पडद्यावर रेखाचित्राचे थेट प्रक्षेपण समितीच्या वतीने करण्यात आले. विजयसिंह पंडित आणि त्यांच्या सहकार्‍यांचे शिवप्रेमी नागरीकांनी अभिनंदन केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष महेश मोटे, कार्याध्यक्ष विठ्ठल पवार, सह कार्याध्यक्ष सरवर पठाण, प्रथमेश वाव्हळ, किशोर वादे, शेख बाबुभाई (जेके), सचिव गजानन पिसाळ, सहसचिव वैभव दाभाडे, कोषाध्यक्ष आकाश पवार सह कोषाध्यक्ष शेख जुनेद यांच्यासह सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी गेवराई तालुक्यातील शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *