तहसिलदार सचिन खाडे यांच्या विरूद्ध वेगवेगळे तिन गुन्हे दाखल
गेवराई दि १९ ( वार्ताहार ) गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व यांच्यासह ईतर लोकांनी परवानगी न घेता घरात घुसुन धमकावल्या प्रकरणी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व त्यांच्यासोबत ईतर सहा ते सात लोकांविरूद्ध तिन वेगवेगळ्या महिलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , तहसिलदार सचिन खाडे यांनी आपल्या काही सहकारी लोकांना सोबत घेऊन गेवराई शहरातील वेगवेगळ्या तिन ठिकाणी जाऊन गैर कायद्याची मंडळी जमवली व परवानगी न घेता घरात प्रवेश करून धमकी दिली आहे अश्या तिन वेगवेगळ्या महिलांनी गेवराई पोलिसांत फिर्याद दिल्या प्रकरणी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व ईतर सहा ते सात लोकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतू तहसिलदार न्यायदंडाधिकारी यांच्यावरूद्ध गुन्हे दाखल झाल्याची घटना ही पहिलीच घटना असु शकते यापुर्वी असे अधिकारी यांच्याविरूद्ध असे गुन्हे दाखल झाले नाहीत तरी या प्रकरणी गेवराई पोलिस तपास करत आहेत लवकरच या प्रकरणी सत्य समोर येईल असे अपेक्षीत आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप काळे करत आहेत या प्रकरणी तहसिलदार सचिन खाडे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...