गेवराई दि १८ ( वार्ताहार ) गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांना काही वाळू माफियांनी घरी जाऊन शिवीगाळ करत धक्का बूक्की केली तसेच त्यांच्या घरावर दगडफेक केली असल्याची माहिती आहे गेवराई पोलिसांत एक वाळू माफियांसह ईतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबद अधिक माहिती अशी की , शहरातील संतोष नगर भागात एका ईमारतीमध्ये तहसिलदार सचिन खाडे यांचे घर आहे ते आपल्या कुटूंबियासोबत त्याठिकाणी राहतात ( काल दि १७ रोजी ) पाच वाजण्याच्या सुमारास पंदरा ते विस जणांनी तहसिलदार सचिन खाडे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्यी धमकी दिली तु वारवांर आमच्याच गाड्या पकडतो तुला दुसरे लोक दिसत नाहित का ? असे बोलुन तसिलदार सचिन खाडे यांना भरदिवसा शिवीगाळ करून धमकी दिली तसेच याठिकाणी काही वाळू माफियां यांनी त्यांच्या घरावर दडफेक केली परंतू दगडफेक झाली नाही असा खुलासा पोलिसांनी केला आहे तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन प्रकरणाचा पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक संदिप काळे हे करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...