गेवराईत सोमवारी मराठा क्रांती मोर्चाची बैठकीचे आयोजन

छत्रपती खा.संभाजीराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा होणार निर्णय 

            गेवराई दि १६ ( वार्ताहार ) 

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न व अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजी राजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 26 फेब्रुवारी पासून महाराज मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे या भूमिकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गेवराई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाज बांधवांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. सोमवारी (दि.21) रोजी सायंकाळी 7 वा ताकडगाव रोडवरील मराठा सेवा संघाच्या जागेत ही बैठक होणार असून समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

     आरक्षणासह अन्य सामाजिक प्रश्नासाठी मराठा समाजाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून चळवळ उभी केली होती. मराठा समाजाने एकमुखाने न्याय हक्कासाठी लढा दिलेला असतांना आज सत्ताधारी आणि विरोधक मात्र या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. छत्रपती खा. युवराज संभाजीराजे यांनी यापूर्वी उपोषण केले होते. परंतू त्यावेळी दिलेली आश्वासने राज्य शासनाने पूर्ण केलेली नसून केंद्र सरकारही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर नाही. यामुळे खा. युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी प्रमुख 5 मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याने समस्त मराठा समाजाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे गेवराई येथील क्रांती मोर्च्याच्या वतीने युवराज छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि. 21) रोजी गेवराईत मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. मराठा सेवा संघाच्या ताकडगाव रोडवरील जागेवर सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *