बीड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणीसाठी खेळाडूनी उपस्थित रहावे – अमरसिंह पंडित

             ( बीड दि.१५ वार्ताहार )

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता बीड जिल्हा कबड्डी असोसिएशचा संघ निवडला जाणार असून २० फेब्रुवारी रोजी गेवराई येथे शारदा कबड्डी अकॅडमी येथे होणाऱ्या अजिंक्यपद व निवड चाचणीसाठी बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियशनचेे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

ठाणे येथे दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ते ३ मार्च २०२२ या कालावधीत होणाऱ्या ६९ व्या वरिष्ठ पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता बीड जिल्हा कबड्डी असोसिएशचा संघ निवडला जाणार असून महिला व पुरुष खेळाडुंची यात निवड करण्यात येणार आहे. सदर निवड चाचणी २० फेब्रुवारी रोजी शारदा कबड्डी अकॅडमी, जगदंबा आयटीआय मैदान गेवराई येथे होणार आहेत. या चाचणीत निवडलेला संघ राज्य स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे. निवड चाचणीसाठी बीड जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियशने उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *