नैतिक जबाबदारी स्विकारली नसल्याने धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजिनामा द्यावा – प्रा किसन चव्हाण

शहाजाणपुर चकला प्रकरणातील पिडीत परिवारास  प्रत्येकी ५० लाखांची मदत करावी

              गेवराई दि ११ ( वार्ताहार )

गेवराई तालुक्यातील शहाजाणपुर चकला या गावांतील सिंदफना पात्रात  वाळुच्या खड्डयामुळे चार शाळकरी मुलांचा नाहक बळी गेला या प्रकरणात राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्विकारली नाही याठिकाणी भेट दिली नाही म्हणुन त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजिननामा द्यावा अशी मागणी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी केली आहे .

तालुक्यातील शहाजाणपुर चकला गावांतील पिडीत परिवाराला सांत्वन करून त्यांची भेट घेतली या दरम्यान जी माहिती समोर आली ती अतिषय धक्कादायक आहे पोलिस प्रशासन आणि महसुलचे जिल्हा प्रशासन यांनी एकमेकांना वाचवण्याचा केलेला प्रयत्न आहे सदर प्रकरणी अपेक्षीत गुन्हा दाखल केलेला नाही यामध्ये चुकीचे कलमे लाऊन दिशाभूल केली असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे यामध्ये महसुलचे तहसिलदार , नायब तहसिलदार , मंडळ अधिकारी , तलाठी , यांना सदर प्रकणात पिडीतेच्या पुरवणी जबाबात आरोपी करावे तसेच पिडीत परिवार हे अनुसुचित जातीचे असल्याने त्याच्यांकडे जाणिव पुर्वक लक्ष दिले जात नाही तसेच या परिवाराला सामाजिक न्यायमंत्री तथा पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली नाही तसेच जिल्हाधिकारी यांनीही भेट दिली नाही .

यामुळे सदर प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न झाला घटना घडल्यानंतर बीड आणि गेवराईचे महसुल या घटनेची जबाबदारी घेत नव्हते मध्यरात्री दोन वाजता प्रशासन घटनास्तळावर पोहचले आणि थातूर मातूर लेखी अश्वासन देऊन हातवरी करू लागले आहेत ऐकमेकांना वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात समिती नेमली आहे यामध्ये या समितीची भुमिका संशयास्पद आहे सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमणुक करावी व या प्रकणात महसुल प्रशासनासह वाळू माफिया यांच्या विरूद्ध मोकोका कायद्याखाली गुन्हे दाखल करावेत पिडीत परिवाराला सर्व शासकीय योजनाचा लाभ देण्यात यावा यांची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच या परिवाराला पोलिस संरक्षण देण्यात यावे लकरच या परिवाराला श्रध्येय प्राकाश आंबेडकर भेट देतील तसेच वरिल मागण्या पुर्ण न केल्यास वंचित बहूजन आघाडी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा पवित्रा घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी राज्य समितीचे सदस्य प्रा विष्णू जाधव , विभागिय अध्यक्ष अशोक हिंगे , विधिज्ञ लताताई बामणे ,विधिज्ञ सोमेश्वर कारके , जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे , जिल्हा उपाध्यक्ष सुदेश पोतदार , तालुका अध्यक्ष पप्पूजी गायवाड शेख दस्तगिर , हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *