चार शाळकरी बालकांच्या मृत्यू प्रकरणी चार माफिया विरोधात गुन्हा दाखल
गेवराई दि १० ( वार्ताहार ) तालुक्यातील शहाजाणपुर चकला परिसरातील गोदापात्रात अवैध वाळू उपसा केेलेल्या खडड्यामुळे चार बालकांचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी चार वाळू माफिया यांच्या विरोधात गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , शहाजाणपुर चकला या ठिकाणी सदरील घटना घडल्यानंतर हद्दीबाबद महसुल प्रशासन ऐकमेकांकडे बोट दाखवायला सुरूवात केली होती परंतू जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती तसेच दोन दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर आज या प्रकणात अहवाल जाईल अशी आशा आहे या प्रकरणी दोषी महसुल अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कार्यवाईची मागणी अनेकांनी केली आहे या प्रकरणी या घटनेस जबाबदार असनाऱ्या चार वाळू माफिया विरोधात पिडीत मुलाच्या वडिलांनी आमच्या मुलांच्या मरण्यास कारनीभूत असनाऱ्या वाळू माफिया विरोधात फिर्याद दाखल केली असुन या प्रकरणी चार वाळू माफिया गेवराई पोलिसांत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक संदिप काळे करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...