व्यापारी अपहरणातील मुख्य सुत्रधार संजय पवार च्या मुसक्या आवळवल्या 

गावठी कट्टा व जिवंत काडतूस ही जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 

                   गेवराई दि १० ( वार्ताहार )

तालुक्यातील मादमोळी येथिल एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी अपहरण करूण स्कॉर्पियो गाडीत वडिगोद्री शिवारातील केलॉलमध्ये हातपाय बांधून फेकले होते या प्रकरणी चकलांबा पोलसांत गुन्हा दाखल होता ( दि ८ रोजी ) चाकण येथुन मुख्य सुत्रधार याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , मादळमोही परिसरातील व्यापारी कैलास आसाराम शिंगटे ( वय ३३ वर्ष ) यांनी या बाबद चकलांबा पोलिस ठाण्यात ( दि २६ जानेवारी ) रोजी चारच्या दरम्यान फोन आला व की शेततळे करायचे आहे आहे तुम्ही साठेवाडी फाट्यावर या असे सांगुन बोलावून घेतले होते व माझ्या मोटार सायकलला लोंखडे वस्तीजवळ पाठीमागून स्कॉर्पिओने धक्का मारून खाली पाडले डोळ्यात मिरची टाकून दहा लाखांची मागणी केली पैसे देण्यास नकार दिल्यानं व तु जर पोलिसांना काही सांगितले तर तुला जिवे मारून टाकु अशी धमकी देऊन गाडीत हातपाय बांधून केनॉल मध्ये फेकून दिले अशी फिर्याद दिली होती त्यावरुन बीड पोलिस अधिक्षक यांनी याबाबद सदर गुन्हा उघडकिस करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्यानंतर लगेच दोन दिवसांनंतर या प्रकरणात असनाऱ्या चार जणानां स्थानिक गुन्हे शाखेने वेगगळ्या ठिकाणावरून अटक केली होती त्यांच्याकडुन तपासा दरम्यान आम्ही हे कृत संजय रामदास पवार यांच्या सांगण्यावरून केली असल्याची धक्कादायक माहती समोर आली या प्रकरणात असलेला मुख्य सुत्रधार संजय रामदास पवार याला चाकण येथून बीड स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे .मादळमोही व कोळगाव परिसरात यांची मोठी दहशत होती याच्यांविरूध्द वेगवेगळे एकविस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जवळील गाडीत एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे आहेत दरम्यान या गावठी कट्याबाबद विचारना केली असता काही दिवसांपुर्वी भाऊ अविनाश पवार यांने मादळमोही येथिल व्यावसायीक पवण गावडे यांच्यावर फायर केल्यानंतर त्याने माझ्या कडे दिला आहे असे त्यांनी पोलिसांना सांगितले असुन त्याला चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *