शिवशारदा पब्लिक स्कूलला केंद्रीय (सी.बी.एस.ई.) मंडळाची मान्यता

शिवाजीराव पंडित यांच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची झाली सोय

                     गेवराई दि ९ ( वार्ताहार ) 

जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवशारदा पब्लिक स्कूल शिवाजीनगर गढी या नावलौकिक प्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेस सण २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सी.बी.एस.ई.) मंडळ दिल्लीची मान्यता मिळाल्याची माहिती शाळेचे प्राचार्य निरंजन प्रसाद दत्ता यांनी दिली आहे.

माजी मंत्री शिवाजीराव (दादा)पंडित यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सन २००२ साली शिवशारदा पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यम शाळेची स्थापना केली होती. या शाळेसाठी दरम्यानच्या काळात माजी आमदार तथा जगदंबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित व सचिव जयसिग पंडित यांनी बीड- जालना रोड वडगाव ढोक फाटा गढी येथे भव्य व सुंदर इमारत उभी केली. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट,व्हॉलीबॉल, खो-खो व २०० मीटरची धावपट्टी या क्रीडांगणासह तज्ञ क्रीडा प्रशिक्षकाची नेमणूक केली. जिल्हा व जिल्ह्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी अ दर्जाचे वस्तीगृह सुरू केले. तालुक्यातील ग्रामीण भागासह तालुक्या बाहेरील दूरवरच्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा उपलब्ध करुन दिली. शाळेत ई- लर्निंग क्लास रूम, गणित पेटी, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रथमोपचार खोली, फिल्टर पाणी या भौतिक सुविधा देत राज्य व परराज्यातील तज्ञ प्रशिक्षीत शिक्षकांची नेमणूक येथे केली. आतापर्यंत शाळेतून दहावीच्या १२ बॅच शंभर टक्के निकालासह उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्या आहेत. तज्ञ प्रशिक्षकाच्या निवडीमुळे शाळेच्या फुटबॉल संघाने दोन वेळा राज्यस्तरापर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. इतरही क्रीडा प्रकारात शाळेचा जिल्हा व जिल्ह्याबाहेर सहभाग असतो.

शिवशारदा पब्लिक स्कुलचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली या नामांकित ग्रुप =कडून शाळेला दोनदा मराठवाड्यात प्रथम तर महाराष्ट्रातून आठवा क्रमांक मिळालेला आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी मेडिकल, इंजीनियरिंग, औषध निर्माण शास्त्र, कृषी व औद्योगिक क्षेत्रात काम करत आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सी.बी.एस. ई.) मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी पालक व विद्यार्थ्याकडून वारंवार मागणी केली जात होती. जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित यांनी दखल घेतली. दरम्यान शाळेने राज्यशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेत प्रस्ताव दाखल केला होता. दिनांक ७ फेब्रुवारी २०२२रोजी केंद्रीय (सी.बी.एस.ई.) मंडळाने शाळेला इयत्ता पहिली ते दहावी वर्गासाठी मान्यता दिली आहे. यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची सोय झाली आहे. सन २०२२-२३साठी शाळेने इयत्ता बालवाडी ते आठवी वर्गासाठी प्रवेश देणे सुरू केले आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य एन.पी.दत्ता यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *