जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली; दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

        महसुलचे अधिकारी               कर्मचारीच दोषी 

                   गेवराई दि ९ ( वार्ताहार )
शहाजाणपुर चकला या ठिकाणी असनाऱ्या गोदापात्रातील खड्ड्यामुळे चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी कार्यवाई करणार असल्याचे सांगितले होते परंतू आता या प्रकरणात अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुत्त करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी रात्री उशिरा काढले आहेत .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गोदापात्र असो किंवा अवैध धंदा असो प्रशासनाला विचारात घेऊनच सगळी कामे केली जातात परंतू गेल्या चार दिवसांपुर्वी चार शाळकरी बालकांचा पाण्यात बूडुन दुर्दैवी अंत झाला या प्रकरणात साधी तलाठ्यावर देखील कार्यवाई करण्यात आली नाही मात्र या घटनेकडे बघण्याचा दृष्टाकोन महसुल प्रशासनाचा वेगळाच आहे हद्दीमुळे ऐकांवर बोट दाखवले जात आहे लेखी अश्वासनानंतर कार्यवाई करणे अपक्षित होते मात्र या प्रकरणी नुसाता कांगावा करण्यात येत आहे अनेक नेत्यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी दोषीवर कार्यवाई करण्याचे निर्देश दिले आहेत व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तर खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणत पिडीत कुटूंबियाविषयी संवेधना व्यक्त केली आहे . चार नष्पाप शाळकरी मुलांचा मृत्यु झाला तरी याला जबाबदार असनाऱ्या अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी चौकशी समिती स्थापन करून काय ? साध्य होणार तसेच आम्ही या प्रकरणी अन्याय सहन करनार नसुन यावर आमची कायदेशीर फिर्याद दाखल करू असे मयत कुटूंबियानी सांगितले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *