गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात तसेच सिंधफणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून हे वाळू माफिया कुणालाही जुमानत नसल्याचे चित्र स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. महसूल विभागाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके तैनात केली असून सोमवारी सायंकाळी उशिरा तपेनिमगाव गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन इंजिन केन्या महसूल विभागाने पकडून त्या ताब्यात घेतल्या आहेत. महसूल विभागाच्या पथकाची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात अनेक ठिकाणी केनीद्वारे बाळू उपसा करण्यात येत असून महसूल व पोलिस विभागाला भरमसाट हमा मिळत असल्याने वाळू माफियांचे मनोबल बाढल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. आतापर्यंत गेवराई तालुक्यात वाळू उपशामुळे जवळपास पंधरा जणांचे बळी गेले आहेत. तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील तपेनिमगाव, गोपतपिंपळगाव, राजापूर, गंगावाडी, म्हसोबा
परिसर, बोरगावथडी, पांढरी आदी ठिकाणी बेनीद्वारे वाळू उपसा करण्यात येत असून बाळू उपसा करणारे माफिया कोण आहेत हे पोलिस व महसूल विभागाला माहित असतांना त्यांच्यावर मात्र कारवाई का केली जात नाही असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. तपेनिमगाव येथे महसूल पथकाने सोमवारी सायंकाळी उशिरा अचानक छापा टाकून दोन केन्या पकडल्या. परंतु ह्या केन्या कोणाच्या आहेत व त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही हा खरा प्रश्न आहे. हि कारवाई तह सिलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विटेकर, सानप व सहकारी कर्मचा-यांनी केली असून त्यांचे या बेधडक कारवाईमुळे कौतुक होत असले तरी अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया नेमके कोण ? आहेत असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...