चार जणांच्या मृत्यू प्रकरणात जिल्हाधिकारी घेणार महत्त्वाची बैठक,कार्यवाही होणार पण कोणावर ?

                  गेवराई : दि. ७ ( वार्ताहार ) 

अवैध वाळू वाहतूक व उत्खनन केल्याने नदीपात्रात पडलेल्या खड्यात बडून चार जणांच्या मृत्यू प्रकरणात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गंभीर दखल घेतली असून, या संदर्भात कडक कारवाई करण्यात येणार असून, नेमकी कार्यवाही कोणावर ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, चार चिमुकल्या जीवांचा मृत्यू प्रकरणात थातूरमातूर कारवाई करू नये, अशी मागणी होऊ लागली असून, ग्रामीण भागात प्रशासना विषयी प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शहजानपूर चकला येथे सिंदफना नदीपात्रातील खड्ड्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. ६ रोजी रात्री उघडकीस आली होती. दरम्यान या दुर्घटनेच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणाकडून संबंधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे चर्चा असून, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मंगळवार ता.८ रोजी बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे कार्यवाही कोणावर होणार ? याकडे लक्ष लागले आहे. शहाजानपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे सुतोवाच धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच सदर घटनेचा तातडीने तपास व चौकशी करण्याच्या सूचना ना.मुंडे यांनी दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, कडक कारवाई झाल्यास तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिस प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, अशी शक्यता व्यक्त होत असून, थातूरमातूर कारवाई झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकां मध्ये चीड निर्माण होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *