विविध सामाजिक संघटनाकडून पिडीत कुटूंबियाचे सांत्वन

दोषींवर अधिकारी,वाळू माफिया यांच्यावर कार्यवाईची मागणी

                     गेवराई दि ७ ( वार्ताहार )

तालुक्यातील शहाजाणपुर चकला या ठिकाणी वाळूच्या खडयामुळे निष्पाप चार शाळकरी मुलांचा मृत्यु झाला प्रशासनाने या बाबद काही ठोस भुमिका घेतली नाही . या प्रकरणी दोषी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सामाजिक कार्यकर्ते यांनी सांत्वनपर भेटदेत कुंटूबियाला आधार दिला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , काल शहाजाणपुर चकला परिसरातील गोदापात्रात वाळूच्या खड्यात बूडून चार बालंकाचा अंत झाला या प्रकरणी आम्ही जबाबदार अधिकारी यांच्या विरूद्ध कायदेशीर कार्यवाई करून त्यांच्या विरूद्ध गुन्हे दखल करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना भ्रमणध्वणीवरून केली आहे या प्रकरणी कुनाचीही गय केली जाणार नाही तसेच या विषयी उद्या तातडीची बैठक बोलावली आहे व निश्चित दोषींवर कार्यवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच पिडीतेला शासकिय मदतही देऊ असेही त्यांनी सांगितले पिडीत परिवाराची बाजू सांगून आम्ही तुमच्या सोबत शेवटपर्यंत आहोत असे सामाजिक कार्यकर्ते यांनी पिडीत परिवाराला सांगितले यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड , एम आय एमचे तालुका अध्यक्ष एजाज मोमिन , डिपीआयचे युवक तालुका अध्यक्ष साईनाथ आडागळे , किशोर भोले , लखन मगर , सह आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *