प्रशासनांकडून लेखी अश्वासन ; फक्त आश्वासन देऊन हातवरी करू नका

चार बालकांचा दुर्दैवी मृत्यु प्रकरणी जबाबदार कोण ?

                                गेवराई दि ७ ( वार्ताहार ) 

गेवराई केवळ अन केवळ पैशाच्या मागे लागलेल्या महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेवराई तालुक्यात वाळूमुळे लोकांचे जीव जात आहेत. तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे वाळूसाठी माफियांनी केलेल्या खड्यात साठलेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा जीव गेला आहे.वाळू माफियाकडून हप्ते घेऊन लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या तहसिलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर आता तरी कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या प्रकरणी महसुल व पोलिस प्रशासनाच्या वतिने लेखी अश्वासन देण्यात आले आहे केवळ अश्वासन देऊन हातवरी करू नका असे प्रकार घडनार नाहीत यांची जबाबदारी घ्या असा असे ग्रामस्थांनी प्रशासनाला सुनावले आहे

या बाबद सविस्तर माहिती अशी की,रात्री    नऊच्या दरम्यान घटना  उघडकिस आल्याने खळबळ उडाली आहे गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहजाणपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या चार बालकांचा खड्यात असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता ग्रामस्थ यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर घरत गोदापात्रात ठिय्या दिला होता मध्यरात्री बीड आणि गेवराई चे महसुल व पोलिस प्रशासन घटनास्तळावर पोहचले आणि या ठिकाणी मयत झालेल्या यांच्या कुटूंबियाना अर्थिक साहाय्य व यापुढेअसे प्रकार घडनार नाहीत यांची दक्षता घेतली जाईल तसेच दोषीवर कार्यवाई केली जाईल असे लेखी स्वरुपात आश्वासन दिले असल्याने या बालकांवर अंत्यस्कार करण्यात येतील अशी माहिती या ठिकाणच्या ग्रामस्थांनी दिला व आज सकाळी त्यांच्यावर उत्तरीय तपासणी करूण अंत्यस्कार करण्यात आले आहेत .
घटना घडल्या नंतर अधिकारी कर्मचारी एकामेकांवर हद्दीबाबद बोट दाखवत होते परंतू बीड आणि गेवराई दोन्ही तालुक्यातील प्रशासन घटना स्तळावर पोहचले होते याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता परंतू वाळू या विषयात बीड जिल्ह्ययात अनेक कारनामे उघडकीस आले मात्र प्रशासन यावर ठोस भुमिका घेत नाही अनेक भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहे याला लगाम लावण्याची आवश्यक्ता आहे .तसेच या निष्पाप बळी गेलेल्या चार बालंकाच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *