आगामी निवडणुकीत वंचितला सत्तेत नेण्यासाठी कामाला लागा
जिल्हाअध्यक्ष उध्दव खाडे यांच्या पदअधिका-यांना सुचना
गेवराई दि २ ( वार्ताहार )
आगामी निवडणूकीत वंचितला सत्तेत पाठवायच्या उद्देशाने काम करा आपला पक्ष सत्तेत घेऊन जाण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे आणि येणा-या काळात वंचितचा झेंडा आपल्याला विधान भवनावर फडकवायचा आहे त्यासाठी तुम्ही कामाला लागा अश्या सुचना जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे यांनी पदअधिकारी यांना दिल्या आहेत आगामी निवडणुका विषयी वंचितची भुमिकेबद्दल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते .
यावेळी जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर , जिल्हा उपअध्यक्ष सुदेश पोतदार , सहसचिव दगडू गायकवाड , सदस्य भिमराव चव्हाण , तालुका अध्यक्ष पप्पू गायवाड यांची उपस्थिती होती पुढे बोलताना ते म्हणाले की आता नुकताचा या तिघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा विषय किचकट केला आहे अद्यापही इंम्पीरियल डेटा सुप्रिम कोर्टात पाठवलेला नाही आरक्षणाचा प्रश्न न्याय प्रविष्ठ आहे तसेच येणा-या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीसह नगरपरिषद निवडणुका जाहिर होणार आहेत त्या अंनुषगाने आपल्याला तयारीला लागायचे आहे आपण ही निवडणूक आपल्या ताकदीवर लढू आणि जिंकूही त्यासाठी आपल्या सर्वांना अथक प्रयत्न करायचे आहेत आणि येणा-या काळात वंचितचा झेंडा आपल्याला विधानभवनावर फडकवायचा आहे त्यासाठी तुम्ही कामाला लागा अश्या सुचना त्यांनी यावेळी पदअधिकारी यांना दिल्या आहेत .तसेच ईच्छूक उमेदवार यांचा कच्चा आराखडा तयार करा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी किशोर चव्हाण , किशोर भोले , बाबासाहेब शरणागंत , प्रदिप तुरूकमारे , धनंजय पवार , अजय खराद ,राजू गायकवाड ,रंजित शिंदे , ज्ञानेश्वर हवाले ,सखाराम पोहिकर ,सोमनाथ साळवे , अमोल साळवे , आकाश साळवे , लक्ष्मण मगर ,संदिप प्रधान , राहूल त्रिभूवन ,विक्रम उन्हाळे , विलास बनसोडे,रूक्षीकेश भोले , बाळासाहेब साबळे, अक्षय उपदेशे ,बबण उपदेशे , ज्ञानेश्वर काशीद , यांच्यासह आदीजन उपस्थित होते .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...