नऊ लाखांच्या गुटखा प्रकरणी दोघांजना विरोधात गुन्हा

                 गेवराई दि १ ( वार्ताहार )
शहरातील एका दुकान व दोन बोलोरो पिकमध्ये गुटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली त्यावरून वरिल दोन ठिकाणी पथकांने छापा मारला तसेच या कार्यवाईत नऊ लखांचा गुटखा मिळून आला व दोघांजनाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , काल दुपारी अचानक पोलिस अधिक्षक आर राजा स्वामी यांच्या पथकाने संजय ट्रेडर्स व बोलेरो पीकअप एम एच २३, ५५ २२ व बोलोरो पीकप एम २३ यु ०१८८ या दोन गाड्यात नऊ लाखांचा गुटखा मिळून आल्यानंतर या प्रकरणी बाळासाहेब लक्ष्मण जाधव ( वय ४४ वर्ष ) रा पाढंरवाडी तसेच तय्यब शेख नुर बागवान ( वय ३० वर्ष ) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे तसेच दरम्यान या झालेल्या कार्यवाई गुटखा माफियात खळबळ उडाली आहे प्रकरणाचा पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक संदिप काळे हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *