शहरातील शिवाजी चौकातील दोन दुकानावर पोलिस अधिक्षक यांच्या विषेश पथकांने धाड टाकली यामध्ये दोन्ही दुकानात मिळून लाखों रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की ,गेवराई शहरात सर्रासपणे गुटख्याची तस्करी केली जाते यांची माहिती गुप्त बातमी दारामार्फत पोलिस अधिक्षक आर राजा स्वामी यांच्या पथकांला मिळाली त्यांनी गेवराई शहरातील संजय ट्रेडर्स व ओम ज्ञानेश ट्रेडर्स या दोन्ही दुकांनावर धाड टाकली यामध्ये लाखों रुपयांचा गुटखा मिळून आला सदरची कार्यवाई झाल्याने गुटखा माफियात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे