मादळमोहीच्या उद्योजकांचे अपहरण करणारी टोळीच्या मुसक्या आवळल्या
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाई
गेवराई दि ३० ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील एका उद्योजकाचे अपहरण करून खंडणी मागितली, खंडणी देण्यास नकार दिल्याने उद्योजकास बेदम मारहाण करण्यात आली. वडीगोद्री जवळ चालत्या वाहनातून फेकून दिल्याची घटना घडली होती. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती तर, मादळमोही येथे घटनेचा निषेध करत एक दिवस बाजारपेठ बंद ठेवली होती अपहरणकर्त्यांना अटक करावी म्हणून बंद पाळण्यात आला. याची दखल घेऊन बीडचे पोलिस अधिक्षकांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सतिष वाघ यांनी छडा लावून अपहरण करणाऱ्या आरोपींना जेरबंद केली आहे या कामगिरीबद्दल बीड पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की , (दिनांक 27 जानेवारीला) फिर्यादी कैलास आसाराम शिंगटे ( वय 33 वर्षे ) रा.मादळमोही ता. गेवराई यांनी पोलिस ठाणे चकलांबा येथे फिर्याद दिली की, मला( दिनांक 26/01/2022 रोजी दुपारी 04.00) वा सुमारास फोन आला की, शेततळे बनवयाचे आहे तुम्ही साठेवाडी येथे या, असे म्हणून मला बोलावुन घेतलं. माझ्या मोटर सायकलला साठेवाडी लोखंडे वस्ती जवळ पाठीमागून स्कॉर्पिओने धक्का मारुन खाली पाडले, डोळयात चटणी टाकुण दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने दांडयाने हातपायावर मारुन तु जर पोलीसांना सांगितले तर , जिवे मारुन टाकु अशी धमकी देवून पाच जणांनी रोडच्या कडेला टाकुण निघुन गेले . अशी फिर्याद दिली. त्यावरून पोलिस ठाणे चकलांबा गुरंन 24/2022 कलम 364 ( अ ) 365 भादवी प्रमाणे दाखल आहे . ही घटना गंभीरतेने घेवून पोलिस अधिक्षक यांनी आरोपीना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकिस आणने बाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे सतिष वाघ यांना गुप्त खबऱ्या व तांत्रिक विश्लेषणाद्वारे बातमी मिळाली की , सदरील गुन्हा 1) संतोष हनुमान धनगर रा . गोपाळवस्ती बेलगाव ता . गेवराई, 2) ज्ञानेश्वर श्रावण माळी रा . गोपाळवस्ती बेलगाव ता गेवराई, 3) रामा भगवान गव्हाणे रा . गोपाळवस्ती बेलगाव ता . गेवराई, 4) संजय रामदास पवार रा . सावरगाव ता.गेवराई, 5) विशाल बाबासाहेब जाधव रा.म्हाळसपिंपळगाव सांगवी ता . नेवासा जि . अहमदनगर यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अमंलदार यांनी यातील संतोष हनुमान धनगर रा . गोपाळवस्ती बेलगाव ता . गेवराई , ज्ञानेश्वर श्रावण माळी रा . गोपाळवस्ती बेलगाव ता गेवराई, विशाल बाबासाहेब जाधव रा.म्हाळसपिंपळगाव सांगवी ता . नेवासा जि . अहमदनगर यांना म्हाळसपिंपळगाव ता. नेवासा येथून तसेच रामा भगवान गव्हाणे यास गोपाळवस्ती बेलगाव येथून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा आम्ही व संजय रामदास पवार रा . सावरगाव ता . गेवराई यांचे सोबत केल्याचे कबुली दिली. सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक आर राजा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ व त्यांच्या टिमने केली आहे .