January 22, 2025

राजकीय हस्ताक्षेप झाल्यानं कार्यवाई न झाल्याचे उघड; मादळमोही आरोग्य विभाग प्रकरण

               गेवराई दि ३० ( वार्ताहार )

मादळमोहीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका महिलेची प्रस्तूती झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती विद्यमान आमदारांनी देखील या घटनेचा निषेधार्थ विधान सभेत लक्षवेधी केली होती मात्र हे प्रकरण दडपता कसे येईल . यासाठी जिपच्या सर्वच डॉक्टरांची टिम कामाला लागली होती परंतू या प्रकरणात मादळमोहीच्या एका राजकीय नेत्यानं हस्ताक्षेप केल्यानं कार्यवाई न करता केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेऊन मुख्य कार्यअधिकारी यांनी संबंधीत डॉक्टर व परिचारीका यांना वाचवले असल्याचे उघड झाले आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , मादळमोहिच्या एका मुजोर परिचारीका हिने नॉरमल डिलेव्हरीचे रूग्ण अससतांना देखील रेफर होण्याचा सल्ला दिला परंतू डॉक्टराना कळवले नाही सदरच्या महिलेला साधे दवाखान्यात दाखल देखिल करून घेतले नाही . याच कारणाने या महिलेची प्रस्तुती आरोग्य विभागाच्या परिसरात झाली होती मात्र या हलगर्जी मुजोर डॉक्टर व नर्सवर कार्यवाई होणे अपेक्षित असतांना या प्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी संबंधीतांना नोटीसा बजावल्या व त्याच्या समोर सुनावनी देखील घेतली परंतू या सुनावतीत एका मादळमोहीच्या स्थानिक नेत्यानं हस्ताक्षेप केला व या नर्सवर कार्यवाई करण्याऐवजी केवळ तिला शंभर रुपयांच्या स्टॅमवर प्रतिज्ञापत्र घेतले व त्याच ठिकाणी कर्तव्य करण्याचे आदेश दिले . परंतू यापुर्वी देखील या नर्सवर कार्यवाई झाली होती मादळमोहीत या नर्सच्या पतीची पॅथलॉजी लॅब आहे दवाखान्यातून थेट तपासणी साठी ब्लड सॅम्पल या लॅबमध्ये जातात अश्या प्रकारे याठिकाणी येणा-या रुग्णांना गंडा घातला जातो अशी माहिती आहे 

परंतू या प्रकरणात चार डॉक्टरांच्या चौकशी समितीनं नियुक्त करण्यात आली होती दरम्यान या समितीनं याठिकाणी जाऊन चौकशी केली होती त्याच्या  अहवाल देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे परंतू यात राजकीय हस्ताक्षेपानं ही कार्यवाई झाली नाही परंतू अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलनेही केली होती तक्रारदार यांचे म्हणनेही मुख्यकार्यकारी अधिकारी ऐकूण घेतले नाही आतापर्यंतच्या ईतिहासात आरोग्य विभातील डॉक्टर व नर्स यांनी कर्तव्यात कुसुर केला असतांनाही देखील थातूरमातूर केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिाज्ञापत्र घेऊन या नर्सला वाचवण्यात आले आहे .म्हणून ह्या केलेल्या कार्यवाईत संशयाचा धूर निघत असुन या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते न्यायलयाचा दरवाजा ठोठवनार असल्याची माहिती आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *