मुकनायक दिनाचे औचित्य साधून होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करणार
गेवराई दि. 29 ( वार्ताहार )
येथील महाराष्ट्र पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, मुकनायक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून, 31 जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचितांचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपताच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी 2022 रोजी मुकनायक वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून, समाजातील युवा उद्योजक तसेच पत्रकारांना विविध क्षेत्रात काम करणाऱ्य व्याक्तींना प्रोत्साहन म्हणून मूकनायक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (IPS)यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार लक्ष्मण पवार, बदामराव पंडित (माजी मंत्री) , मा.आ. अमरसिंह पंडित,( रा. काँ. पार्टी सरचिटणीस) बाबुरावजी पोटभरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. गेवराई तहसीलदार सचिन खाडे, (डी वाय एस पी )स्वप्निल राठोड, ( पी आय.) पेलगुरवार, पोलीस अधिकारी नवले, नवघरे, तसेच विलासराव कोळेकर, सोमनाथराव पाटील, सचिन सानप,मिलिंद तुरुकमारे, उमेश ढाकणे, खेडकर, चिंचोलकर साहेब, भोरे, वाघाडे, इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष अंग म्हणजे लोकनायक पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात प्रेरणेने ऊर्जा मिळते व काम करण्यास नवा उत्साह येतो ही बाब लक्षात घेता उद्योजकांना त्यांच्या उद्योगात नवी भर पाडण्यासाठी उद्योगरत्न या पुरस्काराचे आयोजन केलेले आहे. तसेच मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, मूकनायक पुरस्काराचे मानकरी गेवराई चे ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार ठरले आहेत. शिव स्वराज्य ग्रुपने कोरोना काळात खूप कौतुकास्पद कार्य केले आहे. यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. उद्योग रत्न पुरस्काराचे मानकरी मोतीराम गाडे , विजयकुमार वाव्हळ, मधुकर रावजी मस्के साहेब , तुकाराम तळतकर यांना विशेष उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सौ. छाया ताई मस्के यांना (नारी सन्मान) हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. दीपक नागरगोजे, (सामाज रत्न) रामेश्वर खारगे,( शेती रत्न) संदीप मुळे ,डॉ चंद्रशेखर गवळी, डॉ अनिल दाभाडे ,मोहन देवकते( कोविड योद्धा) तसेच लीलावती व काशिनाथ चव्हाण यांना (आदर्श माता ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन दैनिक संघर्ष योध्दा कार्यालय गेवराई येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक संघर्ष योध्दा संपादक बापूसाहेब हुंबरे व महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रेस कलब अध्यक्ष गेवराई चंद्रकांत नवपुते (सर) यांनी केले आहे. सदरील कार्यक्रम 31 जानेवारी2022 रोजी सकाळी अकरा वाजता वेळेवर सुरू होईल. कार्यक्रम कोविड संदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच कार्यक्रम घेण्यात येईल. कार्यक्रमाला येताना सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...