कारच्या धडकेत एकाचा मृत्यु; राष्ट्रीय महामार्गावरिल अपघात
गेवराई दि २८ ( वार्ताहार ) बीड कडून जालन्या कडे जाणा-या एका चारचाकी कार ने एका तरूणाला जोराची धडक दिली असल्याने त्यांचा जागिच मृत्यू झाला आहे सदरची घटना ( दि २८ रोजी ) च्या मध्यरात्री घडली आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की ,बीड कडून जालन्याकडे जाणारी टोयटो कार क्रं एम एच २१ बी क्यू ०७३७ ही राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना गेवराई जवळील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पाई चालत असना-या उसतोड मजूरांचा मुलगा याला कारने जोराची धडक दिली असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर ईजा होऊन त्यांचा मृत्यु झाला आहे सदर सचिन बसवंत जाधव ( वय २२ वर्ष ) राहनार कुडगी जि विजापूर असे या मयत तरूणाचे नाव असुन हा युवकांचे वडिल जयभवानी सहकारी साखर कारखाना गढी या कारखान्यावर उसतोड मजूर असल्याची माहिती असुन घटना स्तळावर गेवराई पोलिस ठाण्याचे पो ना नवनाथ गोरे , आय आर बी चे डॉ महादेव भातकर , यांनी पंचनामा करून मयताचे शव उत्तरीय तपासणी साठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णलयात आनले आहे .
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...