विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर असावे – राहुल गिरी
गेवराई दि २७ ( वार्ताहार ) विद्यार्थी जिवनात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरु कडुन ज्ञान आत्मसात करावे. शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा उपयोग हा येणाऱ्या पुढील जिवनात उपयोग होतो. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगात विविध कला गुण असतात या कलागुणांना विकसित करण्यासाठी नेहमीच धडपड करावी याचा फायदा कुठे ना कुठे यांचा नक्कीच झाल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी केले.
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत गुरूवार दि.२७ रोजी राहुल गिरी यांना भारत सरकार नेहरू युवा केंद्र आयोजित भाषण सर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्या बद्दल त्यांचा संस्थेचे सचिव गोपीनाथ घुले यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गोपीनाथ घुले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार तथा भाऊ बाबा सेवा प्रतिष्ठान गेवराईचे सचिव शिवाजी मामा ढाकणे, केंद्राचे केंद्र प्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक नामदेव शिंदे, डॉ.सुभाष ढाकणे, शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना राहुल गिरी म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्पधेर्च्या युगात टिकण्यासाठी पुस्तकी अभ्यास शिवाय इतरही पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक असून विद्यार्थी हा रिकाम्या पोहऱ्या सारखा असतो रिकाम्या पोहऱ्यात पाणी येण्यासाठी बकेटीला झुकावे लागते. त्या प्रमाणे विद्यार्थ्यांनी गुरू कडुन ज्ञान घेण्यासाठी नतमस्तक होऊन ज्ञान घ्यावे. आपल्या गुरुचे व आई वडिलांची नेहमी आज्ञेचे पालन करावे. आई वडील व गुरुने केले मार्गदर्शन मोलाचे असते. हा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर येवलेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले यांनी केले. आभार मुक्ता मोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत सोळुंके, अंजली माने, हरिभाऊ आघाव, नवनाथ घुगे, वर्षा कांडेकर, योगेश म्हैसनवाड, प्रसाद कुलकर्णी, शिवाजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे व ज्ञानेश्वर बास्टे आदींनी सहकार्य केले.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...