गेवराई दि २७ ( वार्ताहार ) तालुक्यातील पांगरी गावांत ग्रामपंचायत कार्यलयाच्या समोर प्रजासत्ताक दिनानिमीत्त तिंरगा ध्वज फडकवला जातो आपल्या देशाच्या संविधानाच्या परंपरेनुसार अतिषय थाटामाटात ध्वजारोहनाचा कार्यक्रम केला जातो परंतू पागंरी या गावांत ध्वजा रोहन साजरा करण्यासाठी ना सरपंच ना उपसरपंच ना ग्रामसेवक यांनी चक्क दांडी मारली आणि या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अतिषय बिकट अवस्थेत कोणतेही आदेश नसतांना ग्रामपंचायत सदस्य यांनी ध्वज फडकवला आहे अतिषय गंभीर प्रकार या ठिकाणी घडला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की काल २६ जानेवारी दिवशी पागंरी गावांत प्रतिवर्षी प्रमाणे ध्वजारोहनाचा कार्यक्रम होईल यांची वाट गावांतील नागरिक पाहत होते परंतू गावांतील सरपंच आणि उपसरंपच हे दोघेही बीड ला राहतात तसेच या ठिकाणी कर्त्यव्यावर असनारा ग्रामसेवक यांने प्रशासनाला या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उपस्थित राहनार नसल्याची पुर्व कल्पना न देताच त्यांनेही दांडी मारली आहे या ठिकाणी पागंरी ग्रामपंचायत कार्यलयात एकूण नऊ सदस्य आहेत सरपंच आणि उपसरपंच मिळून वरिल सदस्यांची संख्या आहे . अतिषय असंविधानिक पद्धतीचे कार्य या वरिल लोकांनी केले आहे गावांतील नागरिक यांनी याबाबद सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामसेवकांवर कार्यवाई करावी अशी मागणी केली आहे .या प्रकरणी गेवराईचे गटविकास अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...