गेवराई येथील रुद्रेश्वर अर्बन बँक शाखेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
गेवराई दि २४ ( वार्ताहार )
येथील रुद्रेश्वर अर्बन बँक येथे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला उद्योजकांना बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. महिलांनी आपल्या व्यवसायामध्ये सक्षम होण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज रुपी अर्थ सहाय्य कसे मिळवायचे व आपला व्यवसाय कसा वाढवायचा याविषयी बँकेच्या संचालिका सारिका नवनाथ जाधव यांनी मार्गदर्शन केले. गेवराई शाखेच्या माध्यमातून आज पर्यंत 40 महिला बचत गटांना कर्ज देण्यात आले आहे तसेच ज्या महिला स्वतः छोटे छोटे व्यवसाय म्हणजेच शिवणकाम, कटलरी,भाजीपाला विक्री, व किराणा दुकाने चालवतात त्यांनाही या शाखेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून व्यवसाय वाढवण्यास अर्थ सहाय्य केले आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, उद्योजक,नोकरदार, यांनाही या शाखेच्या माध्यमातून कर्ज रुपी अर्थसाह्य केलेले आहे. याबरोबर महिलांना दररोज ची छोटी सेव्हिग कशी करायची व आपला पैसा वाचून भविष्यासाठी कसा उपयोग करायचा याची माहिती देऊन बँकेच्या सेव्हिग,कंरट, डिपॉझिट स्कीम, आर, डी स्कीम, विविध ठेवीच्या योजना सांगून महिलांनी व व्यापारी वर्ग उद्योजक यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. बँकेचे चेअरमन गोविंद साबळे, व्हा.चेअरमन नितेश जगताप, एम.डी नवनाथ जाधव, शाखा व्यवस्थापक महेश ढवळे, संचालिका सारिका जाधव,पूजा साबळे, भागवत मॅडम, गाडे मॅडम आदींची उपस्थिती होती.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...