April 19, 2025

अट्टल महाविद्यालयाचा ‘आता अवघी दुनिया शिकेल मराठी’ कार्यक्रम संपन्न

                 गेवराई, दि. २२ ( वार्ताहार )

भाषा आणि वाङ्मय मंडळ विभाग, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई, जि. बीड आणि मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा प्रचार – प्रसार ऑनलाईन उपक्रम ‘आता अवघी दुनिया शिकेल मराठी’आज शनिवारी, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाला.

प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विषय तज्ज्ञ प्रकाश सुकदेव कोल्हे, संस्थापक, मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्था, नाशिक आणि संस्थेच्या सचिव ज्योती प्रकाश कोल्हे यांची भाषणे झाली.
पहिली मराठी लँग्वेज स्कूल स्थापन करून यामाध्यमातून विदेशातील विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. आज असंख्य अनिवासी भारतीय पालकांची मुले देशातील आपल्या नातेवाईकांशी मराठीतून संवाद साधत असल्याचे यावेळी कोल्हे दाम्पत्याने सांगितले. अशा स्वरूपाची अभिनव संकल्पना जागतिक स्तरावर रुजवताना विविध व्यक्ती आणि संस्थांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झालेले सहकार्य तसेच भविष्यात या संकल्पाला विस्तारित करण्याचे भाष्यही त्यांनी केले.

कार्यक्रम समन्वयक प्रा. किर्ती वर्मा, विभागप्रमुख, मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल, नाशिक यांनी भाषा स्कूलची संकल्पना स्पष्ट केली. मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे यांनी प्रास्ताविक केले तर संयोजक समाधान इंगळे, प्रमुख, भाषा आणि वाङ्मय मंडळ, अट्टल महाविद्यालय, यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण सोनुने, हिंदी विभाग प्रमुख प्रा. संतोष नागरे यांचे सहकार्य लाभले.प्रा. शरद सदाफुले यांनी अध्यक्षीय भाषण करून सर्वांचे आभार मानले.झूम आणि फेसबुक पेजवरून प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *