April 19, 2025

फेक मेसेज करून केली हजाराेंची फसवणुक

चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल

                    गेवराई दि २० ( वार्ताहार )
तालुक्यातील गाडेवाडी येथील एका तरूणाला मोबाईवर मेसेज करून तूम्हाला नविन आयफोन मिळणार असल्याची बतावनी करून तब्बल ८४ हजाराला गंडा घातला असल्याची फिर्याद चकलांबा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गाडेवाडी येथिल एका महिलेच्या मोबाईल एक अननोन मेसेज आला हा मेसेज या महिलेच्या मुलाने वाचला आणि यात आपल्याला कमी पैश्यात आयफोन मिळेल आणि आपले पैसे परत खात्यावर परत मिळतील असा तोतिया गिरी करणारा मेसेज तरूणांने वाचला व त्यांनी संपर्क करून त्या खात्यावर ऑनलाईन पैसे टाकले नंतर हा सगळा प्रकार कुटूंबियातील लोकांना समजल्या नंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली या प्रकरणी माहिती व तत्रंज्ञान कायद्यासह अन्य कलामान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवले करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *