“कलाविष्कार प्रतिष्ठान” हा गेवराई तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपणारा परिवार – बदामराव पंडित
गेवराई दि 19 ( वार्ताहार )
सहकुटुंब, सहपरिवार एकत्र येऊन कलाविष्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाहक दिनकर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी उपक्रम राबवून, विविध क्षेत्रातील सामाजिक घटकांना एकत्रित आणण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कलाविष्कार प्रतिष्ठान हे केवळ सांस्कृतिक व्यासपीठ राहिले नसून ते आता गेवराईकरांसह तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपणारा परिवार झाला आहे असे गौरवोद्गार शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहेत.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त, कलाविष्कार प्रतिष्ठानकडून छत्रपती मल्टीस्टेटच्या सौजन्याने दि 18 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या गौरव सोहळा व कोरोनाबाबत जनजागृती मार्गदर्शन शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून, शहरातील चिंतेश्वर मंदिर येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून चिंतेश्वर संस्थांनचे महंत दिलीप बाबा घोगे, उद्घाटक माजी राज्यमंत्री बदामराव पंडित तर अप्पर जिल्हाधिकारी प्रसाद चौघुले, तहसीलदार सचिन खाडे, सौ खाडे, छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी, सौ आरतीताई भंडारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कदम, आधार हॉस्पिटलचे डॉक्टर बी आर मोटे, सौ डॉ वर्षाताई मोटे, सहा.पोलीस निरीक्षक संदीप काळे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, नात्यांगण डान्स क्लासचे संचालक प्रतीक कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकपर भाषणात कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे म्हणाले की, पती-पत्नी अशा जोडीने सदस्य असलेल्या कलाविष्कार प्रतिष्ठानमध्ये आज 50 सदस्य आहेत. येत्या काळात सकारात्मक विचारांचे सक्रिय 100 कपल हे प्रतिष्ठानचे सदस्य करणार असून, पुढच्या वर्षी स्मरणिकाही प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. तहसीलदार सचिन खाडे म्हणाले की, समाजामध्ये चांगले काम करणारे अनेक जण आहेत, परंतु त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी मन मोठे लागते. ते मोठे मन कलाविष्कार प्रतिष्ठानकडे आहे. म्हणूनच एवढा मोठा आणि जीवाभावाचा परिवार एकत्र येऊन, ही चळवळ राबवत असल्याचा अभिमान वाटतो. अशी माणसे आपल्या जवळ आहेत, हे गेवराईकरांचे भाग्य असल्याचे ते म्हणाले. महंत दिलीप बाबा घोगे यांनी, कलाविष्कारमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगून, समाजातील उदात्त हेतूने काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे गरजेचे असते आणि ती थाप कलाविष्कार प्रतिष्ठान देते. म्हणूनच आर्थिक प्रबळ असलेल्या व्यक्तींनी सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कलाविष्कारच्या पाठीशी बळ दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रतीक कांबळे, उपोनि संदीप काळे यांची समयोचित भाषणे झाली.
पुरस्कार प्राप्त बालग्राम परिवाराचे संतोष गर्जे, प्रा बापू घोक्षे, रंजित पवार, राहुल गिरी यांनी आपण केलेल्या निस्वार्थी कामाची दखल घेऊन, कौतुक करत, कलाविष्कार प्रतिष्ठानने आपल्या मायभूमीत पुरस्कार देऊन सर्वांसमोर गौरव केला. यामुळे आम्ही भारावल्याचे सांगून, निस्वार्थी, प्रांजळ आणि प्रामाणिक उद्देशाने कलाविष्कार प्रतिष्ठान गौरव करते, हे अकल्पनीय वाटत असले तरी सत्य असल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले. गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी तर शिवप्रसाद आडाळी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी स्वरांजली संगीत क्लासेसच्या सिद्धेश्वरी कोकाटे, अश्विनी कोकाटे, अनुपमा कोकाटे व रामदास कोकाटे यांच्यासह प्रा सुनील मुंडे यांच्या बहारदार गीताने आणि बालग्राम परिवाराच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
उपस्थितांचे स्वागत कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाह दिनकर शिंदे सौ आशा शिंदे, नारायण झेंडेकर, सौ ज्योती झेंडेकर, एकनाथ लाड, सौ कविता लाड, शिवप्रसाद आडाळे, सौ रोहिणी आडाळे, सचिन पुणेकर, सौ प्रियंका पुणेकर, संतोष कोठेकर, सौ स्वाती कोठेकर, गणेश माने, सौ अवंतिका माने, गणेश मिटकर, सौ रेणुका मिटकर, गजानन चौकटे, सौ माधुरी चौकटे, चंपालाल तिवारी, सौ गीता तिवारी यांनी केले.
यांच्या कार्याचा झाला गौरव
श्री संतोष गर्जे (गेवराई भूषण पुरस्कार ), प्रा बापु घोक्षे ( नाट्यरत्न पुरस्कार ), पोउपनि पल्लवी जाधव ( पोलीस रत्न पुरस्कार ), रंजित पवार (समाजरत्न पुरस्कार), अय्युब बागवान (पत्रकार रत्न पुरस्कार), सुनील मुंढे (पत्रकार रत्न पुरस्कार), डॉ अनिल दाभाडे (आरोग्य रत्न पुरस्कार), डॉ अशोक काळे (आरोग्य रत्न पुरस्कार), श्रीमती साविताताई ढाकणे (शिक्षण रत्न पुरस्कार), डॉ राणिताई पवार (क्रीडा रत्न पुरस्कार), महेश बेदरे (कृषी रत्न पुरस्कार), सौ सीताताई महासाहेब ( पर्यावरण रत्न पुरस्कार), राहुल गिरी ( युवा वक्ता पुरस्कार)
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...