बीड एसीबीत वसुलीचे रॅकेट ; उपअधीक्षकांसह पोलिस निरक्षांकावर आरोप
रेटकार्डाचाही तक्रारीत उल्लेख
बीड दि 20 ( वार्ताहार ) बीडच्या लाच लुच प्रतिबंधक विभागात शासकीय कर्मचारी यांच्या कडून लाखों रुपयांची वसुली करण्यात येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना करण्यात आल्यानंतर या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच तत्कालिन उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व विद्यमान असलेले पोलिस निरीक्षक परदेशी यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , यापुर्वी देखील बीडच्या एसीबीवर असे आरोप झाले होते . गेवराई येथील तलाठी दादासाहेब आंदळे यांनी एसीबीचे बिंग फोडले होते या प्रकरणी देखील बीडच्या तत्कालिन पोलिस निरीक्षक राजकूमार पाडवी व रायटर नितीन विर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र , या तक्रारीत देखील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते मात्र त्यांच्यावर कसलीच कार्यवाई झाली नाही नुकत्याच एका सामाजिक कार्यकर्ते यांनी बीड एसीबीत कश्या प्रकारे वसुली केली जाते यांचे रेटकार्ड मुख्यमंत्री , आणि गृहमंत्री यांना केलेल्या तक्रारीत केला आहे . बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विभागाच्या कार्यलयातून तब्बल २४ लाखं रुपयांची वसुली करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार बक्षू आमिर शेख यांनी केला असुन त्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यलयाने तात्काळ या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिल्यानं राज्याच्या एसीबीत खळबळ उडाली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...