गेवराई दि 18 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील हिंगणगाव परिसरातील गोदापात्रात केनीच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती महसुल मधिल नारीशक्ती पथकाला मिळाली यावरून त्यांनी सदर गोदापात्रात धाड टाकली असता वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणा-या केन्या जप्त करण्यात आल्या आहेत .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील अवैैध वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसिलदार सचिन खाडे यांनी नारीशक्ती महसुल पथकांची स्थापना केली आज या पथकांने हिंगणगाव शिवारातील गोदापात्रात छापा टाकला याठिकाणी असनारे वाळू माफिया या पथकाला पाहून पळून गेले व या ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणा-या केन्या जप्त केल्या असुन या कार्यवाईत एक लाखं रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांनी दिली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...