April 19, 2025

नातेवाईकांनी मिळून गेवराई तालुका लुटून खाल्ला – अशोक हिंगे

               गेवराई दि 16 ( वार्ताहार ) 
गेवराई तालक्याचे राजकारण नेहमी सोयरे धायरे यांच्या भोवतीच फिरत आहे गेल्या अनेक वर्षापासुन नातेवाईकांच्या राजकारण करून यांनी तालुका लुटून खाल्ला आहे तसेच यापुढे आम्ही स्वस्थ बसनार नाहीत आगामी निवडणुकीत यांचा वचपा काढू असे प्रतिपादन वंचित चे मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केले चकलांबा याठिकाणी एका शाखा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्याजपिठावर जिल्हाधक्ष उद्धव खाडे , तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड , सुदेश पोतदार , किशोर भोले , रेवण गायकवाड , ज्ञानेश्वर हवाले , भारत खेडकर , यांची उपस्थिती होती .

पुढे बोलताना ते म्हणाले की चकलांबा या सर्कल ने अनेक पुढारी राजकारणात जिवंत केले परंतू जे या ठिकाणी निवडून आले त्यांनी या गटात फिरकून देखील पाहिले नाही आम्ही वंचितच्या माध्यमातून समस्थ वंचित समुहाला राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा तसेच सत्येत वाटा मिळवल्या शिवाय राहनार नाहित तसेच या तिन पायाच्या सरकारने , मराठा , मुस्लिम , ओबीसी समूहाचा घात केला आहे निवडणुकीत यांना आमची मते चालतात परंतू आमच्या विकासाची जबाबदारी यांनी घेतलेली नाही आजही वंचित समुह त्यांच्या मुलभूत प्रश्नांतच अडकलेला आहे त्याचा जिवन म्हणून जगण्याचा विकास झालेला नाही म्हणुन गेवराई तालुका या पंडित – पवारांनी लुटून खाल्ला आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीत यांचा वचपा आम्ही काढू असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.तसेच याठिकाणी ताराबाई साळवे , विमल गायकवाड , नंदाताई गायकवाड , मंडाबाई गायकवाड , जिजाबाई साळवे , विमलबाई साळवे , कांताबाई साळवे , रंजना गायकवाड , शितल साळवे , राजसबाई साळवे , लताबाई साळवे , कविता साळवे , लहानूबाई साळवे , रेखाताई साळवे , लताताई कांबळे यांच्याह अनेक कर्यकर्ते तसेच शाखेचे पदधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *