भारतात क्रांतिकारक महिलांचा इतिहास – शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर
गेवराई, दि. 16 ( वार्ताहार )
‘भारताच्या इतिहासात अनेक महिलांनी क्रांती घडवली असून त्यामध्ये रजिया सुलतानापासून ते माँसाहेब जिजाऊ पर्यंत आणि माँसाहेब जिजाऊ पासून ते अगदी आधुनिक काळापर्यंत भारताच्या इतिहासात स्त्रियांचा फार मोठा क्रांतिकारक इतिहास दिसून येतो. महिलांनीच भारताच्या या अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये मोलाचे योगदान दिलेले असून, त्यांचे राहिलेले कार्य आपण पुढे नेण्याचे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन शिवधर्माचे संस्थापक तथा मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ.अट्टल महाविद्यालय आयोजित ‘जिजाऊ – सावित्री – फातिमा व्याख्यानमाला’ अंतर्गत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘माँसाहेब जिजाऊ यांनी केवळ आपल्या स्वतःच्या मुलालाच उभे न करता तत्कालीन सर्व तरुणांना देखील लढवय्ये केल्याचे दिसून येते. माँसाहेब जिजाऊ यांनी आपल्या आयुष्यात खूप मोठे साम्राज्य उभे केले. अनेक काळ संघर्षात घालवला. कौटुंबिक संघर्षातून त्या तावून-सुलाखून उभ्या राहिल्या आणि केवळ कुटुंबाच्या कलहातच अडकवून न ठेवता, आजूबाजूला समाजात घडणाऱ्या – दिसणार्या – जाणवणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी स्वराज्य उभे करण्याची इच्छा त्यांनी मोठ्या हिमतीने पूर्ण केली. त्यांनी आपल्या मुलाचा केवळ अभ्यासच घेतला नाही, तर एक उत्तम माणूस कसा घडवता येईल याचाही विचार केल्याचे विविध प्रसंगातून आणि उदाहरणातून दिसून येते. स्वराज्य प्रेरिता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञानज्योती फातिमा यांच्यासह अनेक महापुरुषांचे तसेच सर्व भारतीय इतिहासातील क्रांतिकारक महिलांचे भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिसून येते.
त्यांचे राहिलेले कार्य आपल्या सारख्यांनी पुढे चालवण्याची मोठी जबाबदारी व्यवस्थेने आपल्यावर दिलेली असून, आपण प्रत्येकाने आपल्याला जमेल तसे सामाजिक कार्य, सामाजिक बदल, सामाजिक परिवर्तन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पाहिजेत. इतिहासातील सर्व महापुरुषांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची आजही ओळख कायम आहे. जर आपण काही काम केले तरच आपली सुध्दा ओळख निर्माण होणार आहे’ असे बोलताना शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी विविध ऐतिहासिक, पौराणिक प्रसंगांचे, घटनांचे दाखले देऊन आपल्या व्याख्यानात मत मांडले. अत्यंत अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि सहज शैलीत त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.
स्वराज्य प्रेरिता राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानज्योती फातिमा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत समारोप व्याख्यान प्रसंगी ‘स्वराज्य प्रेरिता मासाहेब राजमाता जिजाऊ’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. व्याख्यानमालेच्या संयोजक प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी सुरुवातीला भूमिका मांडली. उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. आभासी पद्धतीने झूम आणि फेसबुक पेजवरून हे व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानमाला आयोजन समितीचे प्रमुख समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. शरद सदाफुले यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांचा परिचय करून दिला, तर डॉ.सुदर्शना बढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नभा इंगळे व अमरजीत बाहेती यांनी जिजाऊ वंदना तसेच जिजाऊ यांना अभिवादन करणारे गीत सादर केले.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...