जिल्ह्यातील देवस्थान जमीन प्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. बीड जिल्ह्यात अनेक जमिनी खालसा केल्याचा आरोप असलेला आणि आष्टी तालुक्यातील गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून समावेश झालेला उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याला अखेर निलंबित करण्यात आले आहे.
आघाव याच्या निलंबनाचे आदेश राज्य सरकारने आज काढले आहेत. बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फच्या जमिनीमध्ये मोठ्याप्रमाणावर गोंधळ झाला आहे. यासंदर्भात आष्टी तालुक्यात ३ गुन्हे दाखल असून बीडच्या शिवाजीनगर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे,. यात भूसुधार विभागाचा तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान हे गुन्हे दाखल होण्यापूर्वीच भूसुधार च्या जमीन खालसा प्रकरणात प्रकाश आघाव याने अनियमितता केल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी शासनास दिला होता . यासर्व पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याला निलंबित करण्यात आले आहे. राज्यशासनाने आज हे आदेश काढले आहेत. जमीन घोटाळा प्रकरणातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...