April 19, 2025

 

शिवसेनेत येणारा कार्यकर्ता पैशामुळे नाही तर प्रेमामुळे येतो – बदामराव पंडित

                 गेवराई दि 14 ( वार्ताहार  )

स्थानिक नेतृत्वाला कंटाळून गंगावाडीचे स्वाभिमानी सरपंच भास्कर हातागळे यांनी आपल्या असंख्य सहकार्‍यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे दोन दिवसापूर्वी भाजपा कार्यकर्त्यांचा प्रवेश घेऊन, जोमात आलेल्या राष्ट्रवादीला गेवराईत शिवसेनेने पुन्हा कोमात पाठवले आहे. शिवसेनेत येणारा कार्यकर्ता हा पैशामुळे नाही तर आपल्या प्रेमामुळे येत असून, तो शेवटपर्यंत जिवाला जीव देणारा कार्यकर्ता म्हणून आपल्या सोबतच राहतो असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे

गेवराई तालुक्यातील तलवाडा सर्कल मधील गंगावाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच भास्करराव हातागळे यांच्यासह भागवत हातागळे, अभिषेक हातागळे, विशाल हातागळे, बाबू पठाण, तुषार हातागळे, साईनाथ नवले, नितेश हातागळे, राजू हातागळे, लक्ष्मण टकले आदींसह असंख्य सहकाऱ्यांसह दिनांक 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवशी, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवा नेते यशराज पंडित यांनी गळ्यात भगवी रुमाल घालून स्वागत केले. याप्रसंगी माजी सभापती पंढरीनाथ लगड, जि प सदस्य युवराज डोंगरे, गोविंद जोशी, युवानेते यशराज पंडित, माजी सभापती गीताराम डोंगरे, शिवसेना तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, माजी पं स सदस्य शेख शकीलभाई, अशोकराव आठवले, अंबादास आठवले, राजाभाऊ विटेकर, पिंटू गर्जे, गोविंद लाड, सरपंच अशोक वंजारे, विशाल उमप, रंजित कांबळे, पप्पू चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोविंद दाभाडे, सोशल मीडिया सर्कल प्रमुख शेख रफिकभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, गेवराई मतदार संघातील राष्ट्रवादी आणि भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात असून, लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण धावून जातो, म्हणूनच शिवसेनेत येणारा प्रत्येक कार्यकर्ता पैशासाठी नाही तर आपल्या प्रेमामुळे येतो. विरोधक मात्र पाच-दहा लाखाच्या कामाची ऑर्डर देऊन किंवा कार्यकर्त्याला अडचणीत आणून, दबाव टाकत बळजबरीने प्रवेश करून घेण्याची नौटंकी करत आहेत. आपला कार्यकर्ता आणि त्याच्या पाठीशी असलेले मित्र हे कोठेही गेले, तरी मनाने माझ्यासोबतच असल्याचा विश्वासही बदामराव पंडित यांनी यावेळी व्यक्त केल. यावेळी बोलताना माजी सभापती पंढरीनाथ लगड म्हणाले की, बदामराव पंडित यांच्या मुळेच खऱ्या अर्थाने हुकुमशाहीच्या जोखडातून गेवराई तालुका मुक्त झाला असून, बहुजनांच्या पोरांना सत्तेत आणून बसविण्याचे कामही त्यांच्या मुळेच झाले आहे. स्थानिक राष्ट्रवादीचे नेते खोटं बोल, पण रेटून बोल या नीतीचे असून, स्वतःचीच बडवून घेण्यात ते धन्यता मानणारे आहेत. त्यामुळे त्यांना जनता कधीच थारा देत नाही. यावेळीही बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेच जि प व पं समितीचे सदस्य मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर शिंदे यांनी केले.

याप्रसंगी बंटी भामरे, शेख कदिरभाई, सुंदर तिवारी, श्रीराम जाधव, दिनेश चिकणे, काशिनाथ हातागळे, नवनाथ हातगळे, माऊली धनवडे, श्रीराम जाधव, प्रकाश शेठ मालानी, चंद्रसेन जाधव, चंद्रकांत पंडित, शौकत भाई सौदागर, सुनील कांडेकर, आत्माराम जाधव, संदीप वालेकर, पत्मा बोराडे आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *