April 19, 2025

ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या प्रभागाची स्वच्छता करावी

                  गेवराई दि 15 ( वार्ताहार )
उमापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र. 5 मधील भिमनगर भागात जवळपास आठशे पेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र या भागात नाली व रस्तेच नसल्याने, सांडपाणी रस्त्यावर येऊन रस्ते चिखलमय होतात तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने सांडपाण्याचे डबके साचून यात डासांची उत्पत्ती होते यामुळे या भागात वास्तव्यास असनाऱ्या नागरिकांना डासाने चावा घेतल्यास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या महाभयंकर रोगाची लागण होते. तसेच डबक्यात साचलेल्या पाण्याची दूर्गंधी सुटत असल्याने उलटी, मळमळ होते.नागरिकांच्या अरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने लवकरात लवकर भिमनगर भागात नाल्या व रस्ते करुन द्यावीत.व स्वच्छता मोहिम राबवावी .

वरिल मागण्यांची दखल न घेतल्यास पंधरा दिवसांनंतर लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत कार्यालय उमापूर येथे तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला. यावेळी श्रावण चव्हाण ग्रामविकास अधिकारी उमापूर ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देतांना मुबारक शेख ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्र. ५,ज्ञानेश्वर हवाले वंचित बहुजन आघाडी तालुका प्रसिद्धीप्रमुख, नरसिंग तुरूकमारे, रविंद्र बनसोडे, रोहन तुरूकमारे, गणेश मोरे, शरद मोरे, लक्ष्मण मोरे अदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *