राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शिवसेनेच्यावतीने दिनांक 12 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 44 युवा रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गाणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती यूद्धजीत पंडीत यांच्या सूचनेवरून युवा नेते यशराज पंडित यांनी गेवराई शहरातील शिवसेना कार्यालयात दिनांक 12 जानेवारी 2000 22 रोजी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला युवानेते यशराज पंडित यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, शहर प्रमुख शेख शहेदाद, सोशल मीडिया प्रमुख सौरभ काळे, सर्कल प्रमुख शेख नवीद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात यशराज पंडित यांच्यासह 44 युवा रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. या रक्तदान शिबिरासाठी जीवनदानी ब्लड बँक बीडच्या डॉ राणी जगताप, नौशाद पटेल, कविता बारगजे, संध्या सानप, वैभवी घुले यांनी सहकार्य केले. यावेळी रक्तदात्यांसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...