गेवराई येथे  ब्युटी पार्लरचा शुभारंभ संपन्न

                   गेवराई  दि 13 ( वार्ताहार ) 
शहरातील ताकडगाव रोड शारदा शाळेसमोर गिरी कॉम्प्लेक्स येथे सईज् मेकओव्हर अॅण्ड ब्युटी पार्लरचा बुधवार दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून कोवीड-१९ च्या नियमांचे पालन करत उद्घाटन शुभारंभ संपन्न झाला.

गेवराई शहरात खास महिलांसाठी सईज् सौंदर्य प्रसाधनगृहाचा शुभारंभ बुधवार दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून सौ.अलका मनोहर गिरी, सौ.उर्मिला अशोक कदम, सौ.रेणुका लहु ढोबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शांताबाई कदम, डॉ.वर्षा माने, सौ.दक्षा वानखेडे, सौ.वंदना घोलप, सौ.सुनिता कदम, सौ‌.अनिता देवढे, सौ.प्राची अरबाड, सौ.गंगा मुंडे, सौ.लक्ष्मी माखले, सौ.आश्विनी सौंदाने, सौ.वंदना घोलप, सौ.वर्षा शेळके, सौ.ज्योती मरकड, गयाबाई देवढे, खरात काकु, सौ.वंदना खरात, कोळपे काकु, श्रध्दा मरकड सह आदि उपस्थित होत्या. दरम्यान शुभारंभ प्रसंगी गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, सचिव सुनील मुंडे, पत्रकार अमोल वैद्य, प्रदिप जोशी, प्रा.राजेंद्र बरकसे, वैजीनाथ जाधव, विनायक उबाळे, प्रसाद कुलकर्णी, प्रा.मनोहर गिरी, शिवाजी ढोबळे, माणिक रणबावळे, गंगाधर कदम, बंडू सौंदाने, गोविंद कदरे, विनोद साळवे, प्रल्हाद खेत्रे, शुभम कदम, विलास सौंदाने यांच्या सह आदी मित्र परिवार यांनी सदिच्छा भेट देवून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सईज् सौंदर्य प्रसाधनगृहाच्या नुतन दालनास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांचे सौ.शुभांगी विनोद पौळ व सौ.दिपाली शुभम कदम यांनी स्वागत केले.तसेच महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू स्पेशल मेकअप ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन सईज् ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ.शुभांगी पौळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *