गेवराई दि 13 ( वार्ताहार ) शहरातील सेवालाल नगर भागात एका चारचाकी गाडीत ठेवलेल्या बॅग आज्ञात चोरट्यांनी पळवली आहे हा प्रकार दूपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला मात्र या घटनेनं गेवराई शहरात खळबळ उडाली आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , सेवालाल नगर या ठिकाणी रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या चारचाकी गाडी क्रं MH 23 BC9977 या स्विफ्ट डिजायर कारमध्ये सात लाखं रूपयाची बॅग ठेवली होती मात्र ती बॅग आज्ञात चोरट्यांनं गाडीच्या काचा फोडून पळवली आहे हा सगळा प्रकार दिवसा ढवळ्या घडल्याने सर्वत्र खळबळ माजली असुन घटनास्तळावर गेवराई पोलिसांनी धाव घेतली आहे तसेच श्वान पथक ही बोलावण्यात आले असुन सदर घटनेची संपुर्ण चौकशी सुरू असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया गेवराई पोलिस ठाण्यात सुरू आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...