बेलापुरामध्ये गतीरोधक बसवण्यासाठी गौसे आजम सेवाभावी संस्थेची मागणी

                   श्रीरामपुर दि 11 ( वार्ताहार ) 

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरमधे सय्यद अल्लाउद्दीन बाबा चौक, नगरबायपास रोड़ व दत्तमन्दिर याठिकानी गतिरोधक बसवण्यासाठी गौसे आजम सेवा भावी संस्था यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.

 या बाबद सविस्तर माहिती अशी की , मौजे बेलापूर येथील श्रीरामपूर-अहमदनगर बायपास रोडवरील कोल्हार चौक याठिकाणी रस्त्यावर गतीरोधक बसविणेबाबत आमच्या संघटनेने तसेच परिसरातील नागरीकांनी आपल्या कार्यालयाकडे वेळोवेळी तोंडी मागणी करूनही आपल्या कार्यालयाने अद्यापही या ठिकाणी गतीरोधक बसविले नाही पूर्वी कोल्हार चौक व दत्त मंदिरासमोर स्पीड ब्रेकर होते परंतु या रस्त्याचे पुन्हा नव्याने डांबरीकरण झाल्याने सदरचे स्पिडब्रेकर गायब झाले. या रस्त्यावर सकाळचे वेळी शाळेमध्ये जाणा-या लहान बालकांची तसेच नागरीकांची मोठी वर्दळ असते तसेच दिवसभर या मार्गावरून अनेक जड वाहने, मोटारसायकल, व अन्य वाहने दिवसभर येत जात असतात श्रीरामपूर- अहमदनगर बेलापूर गावाजवळील बायपास या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व रुंदीकरण झाल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत आहेत बेलापूर येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आजमितीस या गावातील लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रहिवास तसेच व्यापारी दुकाने असल्याने नागरीकांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून जावे लागते या रस्त्यावर नेहमी अवजड गाड्यांची रहदारी चालू असल्यांमुळे रस्त्याच्या कडेला लोकवस्त्या असल्याने तेथील लोकांना अपघाताची भिती वाटत आहे. एक आठवडयापूर्वी एक मोटारसायकस्वार या ठिकाणावरून अत्यंत वेगाने जात होता त्याचवेळी त्याने एका सायकलस्वारास जोरदार धडक दिली त्यामुळे सदर.सायकलस्वारास डोक्यास मोठी दुखापत झाली आहे . असे छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहे. जर याठिकाणी स्पिडब्रेकर असते तर सदर अपघात घडला नसता स्पिड ब्रेकर नसल्यानेच सदरचा अपघात घडलेला आहे. तरी सा. बां. विभागाने श्रीरामपूर-अहमदनगर बायपास रोडवरील कोल्हार चौक याठिकाणी गतीरोधक बसवून गतीरोधक असल्याबाबतचे फलके लावून पांढरे पट्टे मारावेत जेणे करुन अपघात होण्याची घटना टळेल व जिवास कोणीही मुकणार नाही तरी वरीलप्रमाणे येत्या ८ दिवसांचे आत आमचे मागणीप्रमाणे कोल्हार चौक व दत्त मंदिरासमोर गतीरोधक बसवावेत अन्यथा गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी कोल्हार चौक येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान होणा-या सर्व परिणामांची जबाबदारी सर्वस्वी आपणावरच राहिल याची नोंद घ्यावी. यावेळी संस्थेचे संस्थापक मुख्तार सय्यद अध्यक्ष सुलतान शेख उपाध्यक्ष असीम शेख सदस्य मोहसिन सय्यद अरबाज शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *