स्पर्धात्मक परीक्षेत गुणवंत ठरलेल्या 18 विद्यार्थ्यांचा
प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसकडून गेवराईत गौरव
गेवराई दि 11 ( वार्ताहार )
येथील विद्यार्थीप्रिय ठरलेल्या प्राईम लातूर पॅटर्न क्लासेस कडून स्पर्धात्मक परीक्षेत गुणानुक्रमे यशस्वी ठरलेल्या 18 विद्यार्थी, विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसोबत दि 9 जानेवारी रोजी एका विशेष कार्यक्रमात, मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.
प्राईम लातूर पॅटर्न क्लासेस च्या प्रांगणात झालेल्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी क्लासेसचे ज्येष्ठ संचालक नारायण झेंडेकर तर कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक तथा गेवराई तालुका पत्रकार संघाचे सचिव दिनकर शिंदे, कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, युवावक्ता राहुल गिरी, शिववक्ते प्रा राजेश इंदलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासेसचे संचालक सचिन पुणेकर यांनी तर शिवप्रसाद आडाळे, तुळशीदास गाडे, हरिभाऊ जाधव, प्रल्हाद खेत्रे, राहुल आतकरे यांनी उपस्थितांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
जागृती उदे, सुषमा वाकडे, उमेश कर्डिले, प्राची सरवदे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार दिनकर शिंदे म्हणाले की, आज सर्वात क्षेत्रात स्पर्धा सुरू असल्याने, विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेळ द्यावा. निर्व्यसनी राहावे, आई -वडिलांस शरमे ऐवजी अभिमान वाटावा असे काम करावे. तीन तासाचा चित्रपट पाहून त्यातील नायकाप्रमाणे स्वतःला हिरो समाजन्या ऐवजी, समाजामध्ये खऱ्या अर्थाने आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींना नायक समजून त्यांच्यासारखे हिरो होण्यासाठी धडपडावे असे सांगून प्रत्येकाने स्वप्न पाहिलीच पाहिजेत. सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करा म्हणजे आपोआप कुटुंब आणि समाजाप्रती मनात प्रेम आणि आपुलकी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांनी विद्यार्थी व प्राईम लातूर पॅटर्न क्लासेस चे कौतुक करून विद्यार्थ्यांनी मनामध्ये न्यूनगंड न ठेवता सकारात्मक विचार करून आपले ज्ञान भंडार वाढवत रहावे. शिक्षण घेत असताना यासाठी आपले आई-वडील जीव झिझवून आपल्यासाठी प्रयत्न करतायात, याची जाणीव ठेवा. ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्दीने प्रयत्न करून प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत, याचा अभिमान वाटतो. कोणतीही अडचण आल्यास मला केव्हाही फोन करा मी सदैव तुमच्या साठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल गिरी यांनी आपण प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसचा विद्यार्थी असल्याचे सांगून, येथील शिक्षकांनी अतिशय तळमळीने मार्गदर्शन आणि सल्ला दिल्यानेच आपण आज वकृत्व क्षेत्रात काम करू शकलो असे सांगून, थोर व्यक्तींनी कशा पद्धतीने यश मिळवले याचा अभ्यास करून ते कृतीत आणा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अनुजा पघळ, आदिती नागरे या विद्यार्थिनीने केले तर महेंद्र रासकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास पालकांसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत ठरलेल्या खेत्रे हर्षद एकनाथ, वालेकर राणी अशोक, दाभाडे निर्भय प्रमोद, धस किरण दादासाहेब, नाईकवाडे रामेश्वर बप्पासाहेब, पवार सुप्रिया संतोष, खेत्रे शिवराज श्रीराम, धांडे दिपाली नारायण, पानखडे पूजा विक्रम, मडके तृप्ती बद्रीनाथ, सबनकर गीतांजली अनिल, साखरे कोमल सुंदरराव, वेळापुरे निकिता सुनील, म्हेत्रे प्रेम सुनीलराव, लाड रोहित हरिहर, बन संदीप सुंदर, देशपांडे श्रेयश हरिपाथ या 18 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन पालकांसोबत गौरव करण्यात आला.